Inspirational Story: गृहिणीची कमाल! घर सांभाळत जोपासतेय जगावेगळा छंद

Inspirational Story: वंदना जोशी : प्रपंच सांभाळून नारदीय कीर्तन सेवेचा ध्यास!
kirtan
kirtanDainik Gomantak
Published on
Updated on

Inspirational Story: कुठल्याही गोष्टीची आवड जपायची असेल तर त्यासाठी वेळही तेवढाच द्यावा लागतो. तरच त्या गोष्टीचे समाधान मिळते. अशीच एक महिला जिने घरकाम, मुलांचा अभ्यास, गिरण व्यवसाय, बागायती सांभाळून नारदीय परंपरेचे कीर्तन शिकून घेतले, त्या म्हणजे खडकी-सत्तरी येथील वंदना जोशी आहेत. गतवर्षी सुखद-वांते येथील सद्‌गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज येथे त्यांनी कीर्तन सेवेची सुरुवात केली होती.

एखादा विषय कीर्तनासारख्या उपक्रमातून श्रोत्यांसमोर मांडणे हे आव्हानच असते. वंदना जोशींना लहानपणापासून संगीताची आवड होती. वडील शिक्षक, नाट्यकलाकार, संवादिनी वादक, त्यामुळे संगीताचे वातावरण बनले होते. लहानपणी गरिबी आणि साधनसुविधा तेवढ्या नव्हत्या. त्यामुळे आवड जपण्यास अडचण आली. घरात बाबा शिकवायचे तेवढेच वंदना शिकल्या.

लग्न होऊन 23 वर्षे झाली. मुलगा अभिषेक गेली सहा वर्षे विवेक बुवांकडे कीर्तन शिकतो. मुलगी प्राजक्ता चार वर्षे कीर्तन शिकते आहे. त्यासाठी मुलांची तयारी करवून घेणे, पाठांतर करून घेणे, गाणी शिकवणे ही कामे वंदना करायच्या; पण कीर्तन शिकावे असे कधीच त्यांच्या मनात आले नाही. मात्र, अशाच एका कार्यक्रमावेळी गुरुजींनी श्रोत्यांसमोर वंदना यांना कीर्तन शिकण्यास सांगितले होते. विवेकबुवांनी कीर्तन लिहून देऊन शिकण्याचा आदेशच दिला होता.

दोन वर्षांआधी विवेकबुवांनी वाळपईत नारदीय कीर्तन विद्यालय सुरू केले. महत्त्वाचे म्हणजे ते विनामूल्य आहे आणि त्यासाठी जाती धर्माची अट नाही. फक्त नियम व अटींचे पालन केले पाहिजे. विद्यालयात कीर्तनाबरोबरच आपले आचरण, वागणे, बोलणे, वाणी संस्कारीत होण्यासाठी भगवद्‌गीता शिकविली जाते. सूत्रसंचालन कसे करावे, झांज, तबला, संवादिनी वादन, गाणी म्हणणे या गोष्टीही शिकविल्या जातात.

शिवणकाम, घरकाम, बागायती, मसाला, पिठाच्या गिरणीचा व्यवसाय, मुलांचा अभ्यास हा सर्व व्याप संभाळूनच कीर्तनाचा सराव केला जायचा. यासाठी वेगळा वेळ देणे शक्य नव्हते. जिद्द व चिकाटीने हे आव्हान पार केले. गतवर्षी पहिले कीर्तन सादर केले. यासाठी सुखद-वांते येथे योग जुळून आला व तोही वटपौर्णिमेला. प्रपंच संभाळून कीर्तनासारख्या विषयाला हात घालून ते जबाबदारीने सादर करणे, हे वाखाणण्याजोगे म्हणावे लागेल.

kirtan
Vasco: यापुढे बेजबाबदार वाहनमालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्‍हा

वर्ष-दीड वर्षात कर्नाटक, गोव्यात मिळून 29 कीर्तने झाली आहेत. येत्या 30, 31 डिसेंबर 2022 व 1जानेवारी 2023 रोजी सिंधुदुर्ग, गोवा या ठिकाणी कीर्तन व 25 जानेवारीला बिल्वदलच्या कीर्तन संमेलनात सेवा करण्याचे भाग्य लाभणार आहे. शिलाई काम, गिरण, बागायती अशी घरची कामे संभाळून दोन वर्षे कीर्तन शिकते आहे. -वंदना जोशी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com