Secondary Infertility: काय आहे सेकेंडरी इनफर्टिलिटी? महिलांना सतावतेय चिंता; जाणून घ्या कारणे आणि आयुर्वेदिक उपचार

Secondary Infertility Causes: जेव्हा एखादी महिला पहिल्यांदा निरोगी बाळाला जन्म देते पण नंतर गर्भधारणा करु शकत नाही, तेव्हा अशा स्थितीला 'सेकेंडरी इनफर्टिलिटी' म्हणतात.
Secondary Infertility: काय आहे सेकेंडरी इनफर्टिलिटी? महिलांना सतावतेय चिंता; जाणून कारणे आणि आयुर्वेदिक उपचार
Secondary InfertilityDainik Gomantak
Published on
Updated on

What Is Secondary Infertility

जेव्हा एखादी महिला पहिल्यांदा निरोगी बाळाला जन्म देते पण नंतर गर्भधारणा करु शकत नाही, तेव्हा अशा स्थितीला 'सेकेंडरी इनफर्टिलिटी' म्हणतात. ही समस्या स्त्री किंवा पुरुष यापैकी कोणाकडूनही उद्भवू शकते. याची अनेक कारणे असू शकतात. महिलांचे वाढते वय, खराब जीवनशैली, हार्मोनल असंतुलन, अंडाशयातील समस्या किंवा पुरुषांचे कमजोर स्पर्म ही देखील याची कारणे असू शकतात. म्हणून, जर एखाद्या महिलेने पहिल्यांदा मुलाला जन्म दिला परंतु नंतर ती नैसर्गिकरित्या आई होऊ शकत नाही, अशा स्थितीला सेकेंडरी इनफर्टिलिटी म्हणतात. चला तर मग महिलांमध्ये ही समस्या कशी उद्धभवते ते तज्ज्ञांकडून जाणून घेऊया...

तज्ञांकडून सांगण्यात आले की, अशी अनेक जोडपी आहेत, ज्यांना लग्नाच्या 2 वर्षांनी पहिले मूल झाले होते, परंतु ते 7 वर्षांपासून दुसऱ्या मुलासाठी प्रयत्न करत होते आणि ते शक्य झाले नाही. अशा परिस्थितीत, जोडपी डॉक्टरांकडे (Doctor) चकरा मारतात.

Secondary Infertility: काय आहे सेकेंडरी इनफर्टिलिटी? महिलांना सतावतेय चिंता; जाणून कारणे आणि आयुर्वेदिक उपचार
Heart Attack: विमानतळाजवळ राहणाऱ्या लोकांना हार्ट अटॅकचा धोका; संशोधनातून खुलासा

सेकेंडरी इनफर्टिलिटीची कारणे

एका संशोधनानुसार, जर एखाद्या जोडप्याने पहिल्या आणि दुसऱ्या मुलामध्ये 5 वर्षांपेक्षा जास्त अंतर ठेवले तर महिलेच्या एगची क्वालिटी कमी होऊ लागते आणि गर्भधारणेमध्ये समस्या निर्माण होऊ लागतात. याशिवाय, सेकेंडरी इनफर्टिलिटी वाढवणारी इतर अनेक कारणे आहेत. एंडोमेट्रिओसिस प्रमाणेच, हा एक आजार आहे. जो महिलांमध्ये (Women) होतो, ज्यामध्ये गर्भाशयाच्या आत तयार होणारे अस्तर गर्भाशयाच्या बाहेर इतर प्रजनन अवयवांमध्ये वाढू लागते, ज्यामुळे ट्यूबल ब्लॉकेज किंवा ओवरियन सिस्ट सारख्या समस्या उद्भवतात आणि महिलांना आई होण्यात अडचणी येतात. एवढेच नाही तर, जर एखाद्या महिलेला हार्मोनल असंतुलनाची समस्या असेल किंवा तिचा यापूर्वी गर्भपात झाला असेल तर सेकेंडरी इनफर्टिलिटीची समस्या उद्भवू शकते.

किती टक्के महिलांना सेकेंडरी इनफर्टिलिटीचा त्रास होतो?

एका संशोधनानुसार, जगातील सुमारे 20 टक्के जोडपी दुसऱ्या मुलासाठी प्रयत्न करतात परंतु त्यांना गर्भधारणा होत नाही आणि यालाच सेकेंडरी इनफर्टिलिटी म्हणतात. तथापि, तज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधून आणि योग्य उपचार करणे शक्य आहे. विशेष म्हणजे, ती महिला पुन्हा आई होऊ शकते.

Secondary Infertility: काय आहे सेकेंडरी इनफर्टिलिटी? महिलांना सतावतेय चिंता; जाणून कारणे आणि आयुर्वेदिक उपचार
Heart Attack: हृदयविकाराच्या झटक्यापूर्वी 'ही' लक्षणे दिसतात, दुर्लक्ष केल्यास पडेल महागात

आयुर्वेदिक उपचार

तज्ञांकडून सांगण्यात आले की आयुर्वेदात सेकेंडरी इनफर्टिलिटीवर उपचार शक्य आहेत. यामध्ये कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया नाही, उलट पंचकर्म थेरपी, आयुर्वेदिक औषधे, आहार आणि व्यायामानेच ही समस्या मुळापासून नष्ट होऊ शकते. त्याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com