TVS ची दुसरी जबरदस्त इलेक्ट्रिक स्कूटर लॉंच, फुल चार्जमध्ये धावेल इतके किलोमीटर

TVS ही भारतातील आघाडीच्या टू-व्हिलर कंपन्यांपैकी एक असून पेट्रोल इंजिन बाईक आणि स्कूटर तसेच इलेक्ट्रिक स्कूटर देखील बनवते.
TVS X
TVS X Dainik Gomantak

TVS ही भारतातील आघाडीच्या टू-व्हिलर कंपन्यांपैकी एक आहे. ही कंपनी पेट्रोल इंजिन बाईक, स्कूटर तसेच इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री करते. TVS कंपनीने नवी TVS X इलेक्ट्रिक स्कुटर लाँच केली आहे. या स्कुटरमध्ये एलइडी हेड लॅम्प आणि टेल लॅम्पसह अनेक नवे फिचर्स आहेत.

  • TVS X पॉवर पॅक, रेंज आणि टॉप स्पीड

कंपनीने आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर 3.8 kWh बॅटरी पॅक आणि 11kW PMSM मोटरने सुसज्ज केली आहे. ही स्कुटर 105 किमी पर्यंतची रेंज देते. या इलेक्ट्रिक स्कूटरचा टॉप स्पीड 105 किलोमीटर प्रति तास आहे. तसेच, ही इलेक्ट्रिक स्कूटर केवळ 2.6 सेकंदात ताशी 0-40 किलोमीटरच्या वेगाने धावू शकते.

TVS  X
TVS XDainik Gomantak
TVS X
पावसाळ्यात त्वचेला खाज सुटलीय? जाणून घ्या काय करावे अन् काय नाही

या इलेक्ट्रिक सुक्टरची किंमत 2.50 लाख रूपये आहे. TVS X इलेक्ट्रिक स्कूटरची बुकिंग 24 ऑगस्टपासून सुरू होईल. कंपनीने सांगितले की डिलिव्हरी डिसेंबरमध्ये सुरू होणार आहे. सुरुवातीला बेंगळुरूमध्ये त्यानंतर मार्च 2024 पर्यंत इतर शहरामध्ये उपल्बध होईल.

  • TVS X या स्कूटरला देणार टक्कर

TVS ची ही हाय परफॉर्मन्स इलेक्ट्रिक स्कूटर मार्केटमध्ये आधीच असून Ola S1 Pro आणि Ather 450X इलेक्ट्रिक स्कूटरला टक्कर देणार आहे.

  • रंग

TVS X इलेक्ट्रिक स्कूटर सध्या लाल आणि सिल्व्हर कलरमध्ये उपल्बध आहे. भविष्यात या स्कुटरचे विविध रंग पाहायला मिळतील.

  • चार्जिंग

ही स्कुटरमध्ये पोर्टेबल आणि रॅपिड चार्जर असा दोन्ही पर्यायांची सोय आहे. तसेच 950W ऑफ-बोर्ड चार्जर आणि 3000W वॉल चार्जर स्कूटरला असे दोन प्रकारचे चार्जर देण्यात आले आहे. टीव्हीएसचा दावा आहे की बॅटरी केवळ 3 तास 40 मिनिटांत 80 टक्के चार्ज होऊ शकते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com