Tulsi Vastu Tips: तुळशीचे पानं 'या' वेळी तोडणे मानले जाते अशुभ

हिंदु धर्मात तुळशीला खुप महत्व आहे. तुळशीचे रोप घरात ठेवल्याने सकारात्मक उर्जा येते. ज्या घरात तुळशी असते त्या घरात समृद्धी येते.
Tulsi
Tulsi Dainik Gomantak
Published on
Updated on

tulsi vastu tips do not pluck basil leaves by mistake this time read full story

हिंदू धर्मात तुळशीला खूप महत्त्व आहे. या वनस्पतीला माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. भगवान विष्णूचेही तुळशीवर खूप प्रेम आहे. भगवान विष्णूची पूजा तुळशीच्या पानांशिवाय पूर्ण मानली जात नाही. मान्यतेनुसार ज्या घरात तुळशीचे रोप असते त्या घरावर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची कृपा असते. 

ज्या घरामध्ये तुळशीच्या रोपाची नियमित पूजा केली जाते, त्या घरामध्ये लक्ष्मीची कृपा कायम राहते. तुळशीच्या रोपाशी संबंधित काही खास नियम आहेत ज्यांचे पालन करणे महत्त्वाचे आहे.

तुळशीची पानाला शुभ मानले जाते. तुळशीच्या पानांशी संबंधित काही खास नियम आहेत. तुळशीची पाने चुकीच्या वेळी किंवा विनाकारण तोडली तर अशुभ परिणाम मिळतात. तुळशीची पाने विनाकारण तोडून तुम्ही पापी होऊ शकता. तुळशीची पाने शास्त्रानुसार चंद्रग्रहण, सूर्यग्रहण आणि एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने तोडू नका.

याशिवाय रविवारी आणि सूर्यास्तानंतर तुळशीची पाने तोडणे फार अशुभ मानले जाते. शास्त्रामध्ये या दिवसांमध्ये तुळशीची पाने तोडणे हा धार्मिक अपराध मानला जातो आणि त्याचे विपरीत परिणाम भोगावे लागतात.

तुळशीची पाने तोडण्याचा शुभ काळ

तुळशीची पाने तोडण्यापूर्वी नेहमी तुळशीमातेची प्रतीकात्मक परवानगी घ्यावी. तुळशीची पाने तेव्हाच तोडून घ्या जेव्हा तुम्हाला खरोखर गरज असेल अन्यथा तोडू नका. कोणत्याही धार्मिक विधीसाठी तुळशीची पाने तोडणे योग्य मानले जाते. सूर्योदयानंतर आंघोळ केल्यावर तुळशीच्या रोपाला नेहमी स्वच्छ हातांनी स्पर्श करावा. जर तुळशीची पाने आधीच तुटलेली असतील तर त्यांना फक्त स्वच्छ हातांनी स्पर्श करा. 

इतर नियम कोणते

तुळशीचे रोप नेहमी उत्तर, उत्तर-पूर्व किंवा पूर्व दिशेला लावता येते. या दिशेला लावलेल्या तुळशीमुळे घरात सुख-समृद्धी येते. तुळशीचे रोप पूर्व दिशेला लावल्याने घरामध्ये सूर्यासारखी ऊर्जा येते असे मानले जाते. तुळशीचे रोप कधीही दक्षिण किंवा नैऋत्य दिशेला लावू नका. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com