Diwali Travel Tips: दिवाळीनिमित्त मोठ्या संख्येने लोक रेल्वेने प्रवास करतात. ट्रेनने घरी जाताना लोक अनेक भेटवस्तू आणि सामान सोबत घेऊन जातात.
पण दिवाळीत घरी जाताना चुकूनही फटाके सोबत घेऊ नका. खरं तर रेल्वेत होणारे अपघात रोखण्यासाठी काही नियम केले आहेत. यामुळे ट्रेनमध्ये ज्वलनशील वस्तू नेण्यास पूर्णपणे मनाई आहे.
रेल्वेने प्रवास करताना स्फोटक आणि ज्वलनशील वस्तू सोबत ठेवू नका असे रेल्वेने सांगितले आहे. अशा वस्तु सोबत घेऊन जाणे म्हणजे केवळ आपलाच नाही तर इतर सहप्रवाशांचाही जीव धोक्यात घालणे होय.
रेल्वे प्रवासादरम्यान जर तुम्ही अशा धोकादायक गोष्टी घेऊन जात असाल तर तुम्हाला तुरुंगवास भोगावा लागू शकतो, असे रेल्वेने सोशल मिडिया अधिकृत पोस्ट शेअर करत म्हटले आहे.
या गोष्टी सोबत घेऊन जाऊ नका
रेल्वेने प्रवास करतांना फटाके, गॅस सिलिंडर आणि गन पावडर यांसारख्या स्फोटक आणि धोकादायक वस्तू घेऊन जाण्यास पूर्णपणे मनाई आहे.
यासोबतच रॉकेल, पेट्रोल यांसारख्या ज्वलनशील वस्तू ट्रेनमध्ये नेऊ शकत नाही.
तसेच प्रवाशांना ट्रेनमधील दुकाने जाळण्यास देखील मनाई आहे.
प्रवाशांना रेल्वेच्या डब्यात किंवा स्थानकावर धूम्रपान करण्यासही सक्त मनाई आहे.
रेल्वेने प्रवास करताना ज्वलनशील किंवा स्फोटक वस्तू घेऊन गेल्यास रेल्वे कायदा 1989 च्या कलम 164 आणि 165 अंतर्गत तुम्हाला 1000 रुपयांपर्यंत दंड किंवा 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा दोन्ही होऊ शकतात, असा इशारा रेल्वेने दिला आहे. यामुळे चुकूनही असा गोष्टी रेल्वेतसोबत घेऊन जाऊ नका.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.