Travel Tips: नव्या वर्षात फिरालयाला जाण्याचा विचार करताय? मग 'या' सिंपल टिप्स करा फॉलो

जर तुम्ही नवीन वर्षात फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर तुम्ही काही छोट्या टिप्स फॉलो केल्या पाहिजे.
Travel Tips
Travel TipsDainik Gomantak

Travel Tips: नवीन वर्ष जसजसे जवळ येत आहे तसतसे मनात एक उत्साह असतो. आपल्या सर्वांना नवीन वर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहात करायचे असते. जेणेकरून वर्षभर हा उत्सव आपल्या लक्षात राहील.

अनेक लोक नवीन वर्ष कुटुंब आणि मित्रांसोबत घरी साजरा करतात. तर अनेक लोकांना ट्रिपला जायला आवडते. नवीन वर्षात प्रवास करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे.

  • प्लॅन करावे

नवीन वर्षात अनेक लोका ट्रिप प्लॅन करतात. जर तुम्हाला ट्रिप आनंदी आणि अविस्मरणीय बनवायची असेल तर आधी प्लॅन करणे गरजेचे आहे. जेव्हा तुम्ही तुमची तिकिटे आणि हॉटेल इत्यादी आधीच बुक करता, तेव्हा तुमचे पैसेही वाचतात तसेच तुम्हाला कोणतीही अडचण देखील येणार नाही.

  • नवीन ठिकाण निवडावे

नवीन वर्षात तुम्ही कुठेही जाऊ शकता, परंतु तुम्हाला तुमची सहल खूप अविस्मरणीय बनवायची असेल, तर नवीन ठिकाणी फिरायला जाण्याता विचार करावा. तुम्ही याआधी कधीही न पाहिलेल्या ठिकाणी गेलात, तर तुम्ही नक्कीच अनेक नवीन अनुभव घेऊ शकता.

  • बजेट ठरवावे

बर्‍याचदा नवीन वर्षात सर्वत्र प्रवास, निवास आणि जेवणाचे दर वाढतात. त्यामुळे तुमचे बजेट आधीच ठरवावे. त्यामुळे ट्रिप प्लॅन करावी. यामुळे तुमच्यावर आर्थिक ताण येणार नाही.

  • लोकल फुडचा आस्वाद घ्यावा

जेव्हा तुम्ही नवीन वर्षात ट्रिपला जाण्याचा विचार करत असाल आणि तुमची सहल अविस्मरणीय बनवायची असेल, तेव्हा तेथील स्थानिक खाद्यपदार्थ चाखावे. स्थानिक खाद्यपदार्थ फार महाग नसतात आणि तुम्हाला त्या ठिकाणची संस्कृती आणि चव देखील जाणून घेता येते. कोणत्याही ठिकाणची ट्रिप तिथल्या पदार्थांशिवाय पूर्ण होत नाही. त्यामुळे आता तुम्हीही नवीन वर्षात प्रवास करताना या छोट्या टिप्स फॉलो करा आणि तुमची ट्रिप अविस्मरणीय बनवू शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com