असे अनेक लोक आहेत कि ज्यांना वेगवेगळ्या ठिकाण फिरायला आवडते. पण बरेच लोक असे आहेत कि जे विमानाने Air Plane)पाहिल्यादाच प्रवास करतात . त्यांना विमानाने प्रवास करण्याची भीती वाटते. प्रवासापूर्वी मनात विचार येतो कि, तिकीट कसे काढणार, फ्लाइटमध्ये कसे प्रवेश करणार. पण आज आम्ही तुम्हाला पहिल्यांदा विमानात प्रवास करण्यासाठी काही टिप्स(Tips) , खबरदारी आणि इतर महत्वाची माहिती सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला पहिल्यादा विमानात प्रवास करणे सोपे जाईल
* कोणत्या विमानतळावरून फ्लाईट उपलब्ध असेल ते तपासावे
प्रवास करण्यापूर्वी तुमचे विमान कोणत्या विमानतळावरून उड्डाण करणार आहे हे लक्षात घ्यावे. तसे सहसा विमानतळावरून कोणते विमान उड्डाण करेल याची माहिती तिकिटावर लिहिलेली असते. जर हि माहिती नसेल तयार लगेच कंपनीला फोने करून माहिती मिळावा. कारण काही मोठ्या शहरांमध्ये प्रत्येकी दोन विमानतळ आहेत. त्यामुळे तुमच्याकडे योग्य माहिती नसेल तर तुम्ही अडचणीत येऊ शकता.
* इ- तिकीट कॉपी आणि आयडी जवळ ठेवा
अनेक वेळा प्रवास करताना घाईमध्ये कागदपत्रे घेऊन जाणे विसरुन जातो. त्यामुळे प्रवासाला जाण्यापूर्वी सॉफ्ट कॉपी म्हणजेच इ- तिकीट सोबत एअर तिकीटाची हार्ड कॉपी सोबत घ्यायला विसरू नका. तसेच आधारकार्ड, पॅन किंवा पासपोर्ट यासारखे ओळखपत्रे सोबत ठेवावी.
* वेळेच्या अगोदर विमानतळावर पोहोचणे
जेव्हा तुम्ही विमानाचा पाहिल्यादा प्रवास करता तेव्हा वेळेवर विमानतळावर पोहोचणे सर्वात महत्वाचे असते. जर तुम्ही उशिरा विमानतळावर पोहोचले तर तुमची फ्लाईट चुकु शकते.
* बोर्डिंग पास
विमानात प्रवास करण्यासाठी तुम्हाला ओंलीने किंवा ऑफलाईन तिकीट बुक करावे लागेल आणि बोर्डिंग पास घ्यावा लागेल , ज्यामुळे तुम्हाला विमानात प्रवेश मिळेल. प्रथम तुम्हाला विमानतळावर जाऊन बोर्डिंग पास घ्यावा लागेल आणि ज्या एअर लाईन्समध्ये तुम्ही तिकीट बुक केले आहे त्या काउंटरवर तिकीट दाखवून बोर्डिंग पास घ्यावा आणि नंतर तोच बोर्डिंग पास दाखवून तुम्हाला फ्लाइटमी,अधे प्रवेश मिळेल .
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.