'टकल्या' म्हणणं हा लैंगिक छळ; इंग्लंडच्या रोजगार न्यायाधिकरणाने दिला निर्णय

टक्कल पडणे ही समस्या महिलांपेक्षा पुरुषांमध्ये अधिक - न्यायाधीश ब्रेन
Baldness
Baldness Dainik Gomantak
Published on
Updated on

समाजात अनेक जण एकमेकांना वेगवेगळ्या नावावरुन बोलावत असतात. यामध्ये दिसण्यावरुन, स्वभाव, आवडी- निवडी यावरुन ही नावे घेतली जातात. यामध्ये 'टकल्या', 'जाड्या, खादाड्या अशाप्रकारे शब्द सर्रास वापरले जातात. इंग्लंडच्या रोजगार न्यायाधिकरणाने याबाबत निर्णय देताना म्हटले आहे कि, पुरुषाला 'टकल्या' किंवा 'टकल' असं म्हणणं, लैंगिक छळ ठरु शकतो.

Baldness
कोरोनाची नवीन चार लक्षणे आली समोर, केसांची गळती होत असेल तर सावधान

हा निर्णय मनोरंजक वाटत असला तरी यामुळे लैंगिक छळाची व्याप्ती वाढली आहे. टोनी फिन हे एका कंपनीत जवळपास 34 वर्षे इलेक्ट्रिशियन पदावर कार्यरत होते. त्यांना नोकरीवरून काढून टाकल्यानंतर, फिनने कंपनी मालकाविरुद्ध समानता कायदा 2010 अंतर्गत तक्रार दिली. जेमी किंगने कंपनीवर त्यांना ‘टकल्या’ असं म्हणत लैंगिक छळ केला, असा दावा किंग यांनी केला. कंपनीने या आरोपावर कोणताही विवाद केला नाही.

Baldness
रशिया युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे संसद गट पोहोचले झेलेन्स्कीच्या भेटीला

एम्प्लॉयमेंट जज ब्रेन यांनी मत मांडलं की, 'टक्कल' हा शब्द लैंगिकतेशी संबंधित आहे. न्यायाधीश ब्रेन यांच्या अध्यक्षतेखालील तीन पुरुष न्यायाधीशांच्या पॅनलने या संदर्भात निकाल दिला. न्यायालयात तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने आपल्या निकालात टक्कल पडण्यावरील टिका किंवा टिपण्णी हा केवळ अपमान किंवा लैंगिक छळ असू शकते का, अशा अनेक कारणांवर विचारविनिमय केला.

न्यायाधीश ब्रेन यांनी या प्रकारणाचा निकाल देताना नमूद केलं की, 'टकल्या शब्दाचा व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाशी संबंध आहे. याचा संबंध लैंगिकतेशी आहे. कारण टकलं पडणं ही समस्या महिलांपेक्षा पुरुषांमध्ये अधिक प्रमाणात आढळली जाते. त्यामुळे एखाद्या पुरुषाला टकल्या म्हणणं हा लैंगिक छळ असू शकतो.' त्यामुळे त्यांनी निकालात म्हटलं की, पुरुषाला टकल्या म्हणणे हा लैंगिक छळ आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com