Stay Young Forever : दीर्घकाळ चिरतरूण आणि तंदुरुस्त राहायचंय? मग आजच सोडा 'या' सवयी

How To Live Healthy And Longer : निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी निरोगी जीवनशैली खूप महत्त्वाची आहे.
How To Live Healthy And Longer
How To Live Healthy And LongerDainik Gomantak
Published on
Updated on

How To Live Healthy And Longer : निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी निरोगी जीवनशैली खूप महत्त्वाची आहे. त्याच वेळी, निरोगी जीवनशैलीचा अवलंब करण्याचा निर्णय कोणत्याही वयात घेतला जाऊ शकतो. होय, असे केल्याने तुम्ही तुमची जीवनशैली आणखी चांगली बनवू शकता. यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे असते.

निरोगी राहण्यासाठी हिरव्या भाज्या, फळे, कडधान्ये, सुक्या मेव्यांचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे. त्याच वेळी, काही वाईट सवयी तुमची मेहनत खराब करू शकतात. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की निरोगी राहण्यासाठी तुम्ही कोणत्या सवयी सोडल्या पाहिजेत. (Tips To Live Healthy And Longer)

How To Live Healthy And Longer
Cold-Cough Remedy : हिवाळ्यात खोकल्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी वापरा 'हे' 5 नैसर्गिक उपाय

निरोगी राहण्यासाठी आजच सोडा या सवयी :

  • पांढऱ्या गोष्टी सोडा:

काही पांढऱ्या गोष्टी तुमच्या आरोग्यावर परिणाम करू शकतात. यामध्ये साखर, मीठ आणि मैदा यांचा समावेश आहे. साखर आणि मीठ देखील आरोग्यासाठी चांगले नाही. दुसरीकडे, जर तुम्ही तुमच्या आहारात या गोष्टींचा समावेश केला तर भविष्यात ते तुमच्या शरीराचे नुकसान करू शकतात. त्यामुळे आजच त्यांच्यापासून दूर राहा.

  • दिवसभर बसणे :

आजकाल अनेकांना दिवसभर बसून राहण्याची सवय असते. किंवा तुम्ही ऑफिसमध्ये काम करताना नेहमी बसून असाल तर ते एक प्रकारे तुमच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. जास्त वेळ बसून राहिल्यास अनेक आजारांनाही बळी पडू शकता. म्हणूनच तुम्ही दररोज 30 मिनिटे व्यायाम करणे आवश्यक आहे. (Tips to Stay Young Forever health care to live longer)

  • पुरेशी झोप न घेणे :

जे लोक 5 तासांपेक्षा कमी झोप घेतात त्यांना हृदयविकाराचा धोका जास्त असतो. कारण कमी झोप झाल्यामुळे तुमच्या शरीराला त्रास होतो. यामुळे शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडते. त्यामुळे तुम्हालाही कमी झोपण्याची सवय असेल तर आजच ही सवय बदला आणि रोज किमान 8 तासांची झोप नक्कीच घ्या.

  • सिगारेट, तंबाखू आणि दारूचे सेवन करणे

तुम्हालाही सिगारेट, दारू किंवा तंबाखूचे सेवन करण्याची सवय असेल, तर आजच ही सवय बदला, या सवयी तुमचे आयुष्य अनेक वर्षे कमी करतात आणि तुम्हाला वयाच्या आधीच वृद्ध बनवतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com