Throat Pain Causes: पाणी पिताना अन् पदार्थ गिळताना घशात तीव्र वेदना होत असेल तर वेळीच व्हा सावध...

जर तुम्हाला पाणी पिण्यात आणि पदार्थ गिळण्यात त्रास होत असेल तर गंभीर समस्या निर्माण होऊ शकते.
Throat Pain Causes
Throat Pain CausesDainik Gomantak
Published on
Updated on

Throat Pain Causes: हवामानातील बदलामुळे सर्दी आणि घसा खवखवणे किंवा त्यामुळे त्रास होणे सामान्य आहे. पण कोमट पाणी पिल्याने ही समस्या कमी वेळात बरी होऊ शकते. 

परंतु, जर तुम्हाला अनेकदा घसा खवखवत असेल किंवा पाणी पिताना आणि पदार्थ गिळताना त्रास होत असेल तर येत तर दुर्लक्ष करू नका. हे डिसफॅगियासारख्या गंभीर आजाराचे लक्षण असू शकते. 

त्यामुळे चुकूनही त्याच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. कारण यावर वेळीच उपचार न केल्यास भविष्यात ही समस्या अधिक गंभीर बनू शकते.

डिसफॅगिया म्हणजे काय

जर तुम्हाला थुंकी, पाणी किंवा पदार्थ गिळण्यास त्रास होत असेल तर तुम्हाला डिसफॅगियाचा त्रास होऊ शकतो. डिसफॅगिया तेव्हा होतो जेव्हा एखाद्या व्यक्तीची अन्ननलिका पूर्णपणे ब्लॉक होते. याशिवाय अन्ननलिकेमध्ये ट्यूमर झाल्यास डिसफॅगिया भयंकर रूप धारण करतो. कधीकधी डिसफॅगिया हळूहळू वाढतो. अशा परिस्थितीत रुग्णाला कोरडे अन्न खाण्यासही त्रास होऊ लागतो. रुग्णांना लाळ गिळताना देखील त्रास होतो.

लक्षण कोणती

  • पदार्थ किंवा पाणी गिळताना त्रास होणे.

  • वारंवार उलट्या होणे.

  • पदार्थ चिकटलेले आहे असे नेहमी वाटणे.

  • पदार्थ घशात अडकणे

  • पदार्थ खाल्ल्याने खोकल्याची समस्या

  • एंडोस्कोपी

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, डिसफॅगिया किंवा घशाचा कर्करोग झाल्यास लवचिक नळीच्या मदतीने एंडोस्कोपी केली जाते. ही एक ट्यूब आहे, ज्याच्या एका बाजूला कॅमेरा जोडलेला आहे. अशा स्थितीत नळीचे पहिले टोक रुग्णाच्या तोंडात टाकून उपचार केले जातात. ही चाचणी 2-3 मिनिटांत केली जाते आणि ही एक सोपी चाचणी आहे. त्यामुळे घाबरण्याची गरज नाही.

  • बायोप्सी

तुम्हाला कोणत्या प्रकारचा कर्करोग आहे हे शोधण्यासाठी बायोप्सी केली जाते. तसेच, डॉक्टर ही चाचणी करतात. जेणेकरून ट्यूमरचा आकार निश्चित करता येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com