Spa Center In Goa: गोव्यात स्पा सेंटरला जाताना अशी घ्या काळजी

Spa Center In Goa: योग्य आणि सुरक्षित स्पा सेंटर ओळखण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत.
Spa Center In Goa
Spa Center In GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Spa Center In Goa: गोवा निसर्गरम्य सौंदर्य आणि विश्रांतीसाठी ओळखले जाते. गोवा हे भारतातील लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. याठिकाणी तुम्हाला कॅसिनो, बीच लाईफ, क्रुझ, याव्यतिरिक्त विविध प्रकारचे स्पा सेंटर देखील उपलब्ध आहेत.

बऱ्याच लोकांना स्पा सेंटर म्हणजे काय हे माहित नसते याबाबत अनेक गैरसमज आहेत. पर्यटकांच्या चर्चेत गोव्यातील स्पा सेंटरबाबत मत फारसं चांगले नाही.

यासाठीच योग्य आणि सुरक्षित स्पा सेंटर ओळखण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत.

Spa Center In Goa
Passport Issue In Goa: ‘पासपोर्ट संदर्भातील मुद्दा तातडीने सोडवावा’

परवाना तपासा:

स्पा किंवा मसाज पार्लरला त्याच्या ठिकाणी चालवण्याचा परवाना शक्यतो दिसेल अशा ठिकाणी समोर ठेवलेला असतो, त्याची योग्य पध्दतीने पडताळणी करा.

तुम्ही ही माहिती सहसा त्यांच्या वेबसाइटवर बघू शकता किंवा स्थानिक आरोग्य विभागांशी संपर्क साधून शोधू शकता.

ऑनलाइन रेटींग पहा:

Google वर सारख्या स्त्रोतांकडून ऑनलाइन प्रतिक्रिया पहा, याठिकाणी तुम्हाला सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही रेटींग पहायला मिळतील.

वेबसाइटला भेट द्या:

कायदेशीर व्यवसायांमध्ये त्यांच्या सेवा, किंमती आणि संपर्क तपशीलांबद्दल तपशीलवार माहिती असलेल्या व्यावसायिक वेबसाइट्स असतात. वेबसाइटवर आवश्यक माहिती नसल्यास सावध रहा.

अनुभव विचारा:

एखाद्या विशिष्ट स्पा किंवा मसाज पार्लरमध्ये सकारात्मक अनुभव आलेले मित्र, कुटुंब किंवा सहकाऱ्यांकडून माहिती घ्या.

हे मसाज पार्लर टाळा:

रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या सेवांची जाहिरात करणाऱ्या मसाज पार्लर किंवा स्पाबद्दल संशयी रहा. कायदेशीर व्यवसाय हे सामान्यत: माध्यम आणि ऑनलाइन जाहिरातींवर अवलंबून असतात.

कायदे आणि नियमांचे पालन:

स्पा आरोग्य आणि सुरक्षा मानकांशी संबंधित स्थानिक कायदे आणि नियमांचे पालन करत असल्याची खात्री करा. विनापरवाना किंवा पालन न करणारे मसाज पार्लर तुमच्या आरोग्याला धोका निर्माण करू शकतात.

सुरक्षेच्या दृष्टीने योग्य मसाज पार्लर आणि स्पा सेंटर ओळखणे महत्त्वाचे आहे. ही सामान्य मार्गदर्शक तत्त्वे आहेत, मसाज पार्लर किंवा स्पा निवडताना सतर्क राहणे महत्त्वाचे आहे.

एखाद्या स्पाला भेट देताना, त्यांच्या विशिष्ट ऑफर तपासा आणि आवश्यक असल्यास बुकिंग करा. दैनंदिन ताणतणावांपासून मुक्त होण्यासाठी स्पा ला भेट देणे महत्वाचे आहे. स्पा केंद्रे त्यांनी दिलेल्या सोयी नुसार पैसे आकारतात. तसेच त्यांच्या सेवांमध्येपण बदल होतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com