Super Food: आळस पळवून लावणारे '5' सुपरफुड

ज्या लोकांना खुप आळस येतो त्यांनी आपल्या आहारात काही पदार्थांचा समावेश करणे गरजेचे आहे.
Super Food For lazy people
Super Food For lazy peopleDainik Gomantak
Published on
Updated on

Super Food: अनेक लोकांना छोटे छोटे काम करणे देखील अवघड जाते. याचे कारण अपुरे पोषण असू शकते. यासाठी वेळेवर पोषक आहार घेणे गरजेचे असते. यामुळे तुम्हाला आळस,थकवा, चिडचिड होणार नाही. हे सुपरफुड कोणते आहेत हे जाणून घेऊया.

Banana
Banana Dainik Gomantak
  • केळी

केळी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. यामध्ये पोटॅशियम, खनिजे आणि जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. तसेच टरबूज हायड्रेशन वाढवून थकवा दूर करण्यासाठी मदत करते.

Mushroom
MushroomDainik Gomantak
  • मशरूम

मशरूम ऊर्जेचा उत्तम पर्याय आहे. यामध्ये प्रोटीन, फायबर, फोलेट, व्हिटॅमिन बी, कार्ब्स असतात. जे शरीराला त्वरित ऊर्जा देते आणि आळस दूर करते.

Avocoda
AvocodaDainik Gomantak
  • एवोकॅडो

एवोकॅडोमध्ये भरपूर प्रमाणात पोषक घटक असतात. ज्याचा शरीर ऊर्जेसाठी वापर करतो. हे पदार्थ थकवा दूर करण्यास मदत करतात. यामुळे आहारात याचा समावेश करावा.

Pumpkin Seeds
Pumpkin SeedsDainik Gomantak
  • भोपळ्याच्या बीया

भोपळ्याच्या बिया निरोगी आरोग्यासाठी फायदेशीर असतात. प्रथिनेसारखे पोषक घटक देखील असतात. ज्यामुळे आळस दूर होतो. यामुळे आहारात भोपळ्याच्या बीयांचा समावेश करावा.

Super Food
Super FoodDainik Gomantak
  • इतर सुपरफुड

बदाम ,सब्जा, पालक, अंडी हे देखील सुपरफुड म्हणून ओळखले जातात. या पदीर्थांचे नियमित सेवन केल्यास तुम्हाला थकवा जाणवणार नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com