Increase Eyesight Naturally: 'ही' 5 फळं दृष्टी वाढवण्यास करतात मदत

बदलत्या जीवनशैलीमुळे दृष्टी कमी झाली असेल तर या फळांचा तुमच्या आहाराचा समावेश करू शकता.
Eyesight Home Remedies
Eyesight Home RemediesDainik Gomantak
Published on
Updated on

Increase Eyesight Naturally: शरीराची काळजी घेण्याबरोबरच डोळ्यांची काळजी घेणे देखील गरजेचे आहे. आजकाल मोबाईल, डेस्कटॉप आणि लॅपटॉपवर तासनतास घालवण्यामुळे जवळजवळ प्रत्येकाला दृष्टी खराब होण्याची समस्या निर्माण होत आहे. जर बदलत्या जीवनशैलीमुळे दृष्टी कमी झाली असेल तर पुढील फळांचा आहारात समावेश करावा.

दृष्टी वाढवण्यासाठी ही पाच फळे खाणे फायदेशीर ठरते. यामध्ये मुबलक प्रमाणात जीवनसत्त्वे असतात. जे केवळ दृष्टी सुधारत नाहीत तर मोतीबिंदू आणि काचबिंदू सारख्या समस्यांपासून डोळ्यांचे संरक्षण करतात. 

संत्री


संत्री खाल्ल्याने दृष्टी सुधारते. यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते. हे डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप चांगले आहे. त्यात अँटिऑक्सिडेंट गुणधर्म देखील आहेत जे मॅक्युलर डिजेनेरेशनपासून संरक्षण करतात. 

Eyesight Home Remedies
Tips for Healthy Life: 'या' 8 गोष्टी तुम्हाला निरोगी अन् आनंदी आयुष्य जगण्यास करतील मदत

पीच


पीच हे आरोग्यासाठी खूप चांगले आहे. पीचमध्ये फायबर, व्हिटॅमिन सी, झिंक, कॉपर असे अनेक पोषक घटक असतात. हे डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगले असतात आणि डोळ्यांच्या रेटिनाची देखील काळजी घेतात. तुम्ही डोळ्यांच्या निरोगा आरोग्यासाठी पीच हे फळं खाऊ शकता.

पपई


दृष्टी सुधारण्यासाठी तुम्ही पपईचे सेवन करू शकता. पपईमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई आणि बीटा-कॅरोटीन असते. आपल्या आहारात त्याचा समावेश करून दृष्टी सुधारू शकता. 

किवी


खाल्ल्याने व्हिटॅमिन सी आणि ई मिळते. ते डोळ्यांसाठी चांगले असते. किवी खाऊन तुम्ही डोळ्यांच्या आरोग्याची काळजी घेऊ शकता. हे फळं दृष्टी चांगली ठेवण्याचे काम करते. त्यामुळे मोतीबिंदूचा धोका कमी होतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com