Pregnancy Tips in Marathi: जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) आकडेवारीनुसार, जगभरात दरवर्षी 4 ते 50 दशलक्ष गर्भपात केले जातात. याचे एक प्रमुख कारण म्हणजे गरोदरपणात महिलांकडून अशा काही चुका होतात, ज्यामुळे गर्भपात होण्याचा धोका वाढतो. आपण अशाच 5 चुका पाहणार आहोत ज्या महिलांनी गरोदरपणात करू नयेत.
गरोदरपणात या 5 चुका करू नका
1. वाकणे टाळावे
गरोदर महिलांनी पुन्हा पुन्हा वाकणे टाळावे, कारण यामुळे गर्भावर नको असलेला दबाव पडतो, प्री-मॅच्युअर डिलिव्हरी होण्याची शक्यता वाढते. अशा परिस्थितीत झाडू आणि मॉप लावण्यासाठी लांब काठी वापरा. शक्यतो पायऱ्यांऐवजी लिफ्टचा वापर करा.
2. जास्त वेळ उभे राहू नका
बऱ्याच स्त्रिया बहुतेक काम उभे राहून करतात, परंतु दीर्घकाळ असे केल्याने गर्भावर अधिक दबाव येतो. या स्थितीत महिलांनी 20 मिनिटांपेक्षा जास्त वेळ सतत उभे राहू नये. शक्य तितके बसून काम करा
3. खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्या
गरोदरपणात (Pregnant) खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्यावी. जास्त वेळ रिकाम्या पोटी राहू नये. तेलकट आणि अस्वास्थ्यकर पदार्थांपासून दूर राहा. ताजी फळे, नारळ पाणी, (coconut water) फळांचे रस प्या. यामुळे शरीर हायड्रेट राहील.
4. आरामदायी पादत्राणे घाला
योग्य पादत्राणे निवडणे महत्वाचे आहे. अशा स्थितीत उंच टाच असलेल सँडल अजिबात घालू नका, त्यामुळे चालताना त्रास होतो. आरामदायक शूज आणि चप्पल परिधान केल्याने तुम्हाला आराम मिळेल.
5. जड वस्तू उचलू नका
महिलांनी जड वस्तू उचलण्यापासून परावृत्त केले पाहिजे, जसे की जड बेड किंवा सोफा साफ करताना इकडे तिकडे सरकवणे. पाण्याची बादली उचलणे इ.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.