Health Tips: तुमच्या नैराश्याचं कारण ठरू शकतो तुमचा आहार, जाणून घ्या कसे

अस्वास्थ्यकर आणि फास्ट फूडचे सेवन केल्याने नैराश्याने ग्रस्त होण्याचा धोका वाढला आहे
Is your diet making you depressed?
Is your diet making you depressed?Dainik Gomantak

आपल्या आहारामुळे (diet) आपल्या भावनांवर (emotions) परिणाम होतो. आश्चर्य वाटलं ना ? पण ही गोष्ट अगदी खरी आहे. या मागे एक वैज्ञानिक कारण आहे, आपला मेंदू (brain) आणि अन्ननालिकेचा (GI tract) जवळचा संबंध आहे. 'आपण जे खातो तेच आहोत', असे जर्मन तत्त्वज्ञ लुडविग फ्युअरबाक (German philosopher Ludwig Feuerbach) यांनी दोन शतकांपूर्वी सांगितले होते. त्याच्या शब्दांचा संदर्भ वेगळा असू शकतो परंतु ही म्हण आजही खरी आहे, कारण अनेक वैज्ञानिक अभ्यासांनी हे सिद्ध केले आहे की निरोगी आहारामुळे एखाद्याच्या मनावर आणि शरीरावर सकारात्मक परिणाम होतो. आणि आपण जे खातो त्यावर आपला मूड आणि व्यक्तिमत्व अवलंबून असते.

Is your diet making you depressed?
Beauty Tips: ही सौंदर्य प्रसाधने खरेदी करणे म्हणजे पैशाची नासाडीच

अस्वास्थ्यकर आणि फास्ट फूडचे सेवन केल्याने नैराश्याने ग्रस्त होण्याचा धोका वाढला आहे, असे पब्लिक हेल्थ न्यूट्रिशन जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात म्हटले आहे. तर दुसरीकडे, पौष्टिक आणि संतुलित आहार खाणे तुमच्या हे तुमच्या नैराशीयच्या लक्षणांचा धोका कमी करतो. आपल्या आहारामुळे आपल्या भावनांवर परिणाम होण्यामागे एक वैज्ञानिक कारण आहे, ते म्हणजे आपला आपला मेंदू आणि अन्ननालिकेचा जवळचा संबंध आहे. जेव्हा आपण चांगले खातो, तेव्हा निरोगी जीवाणूंची एक पिढी असते जी पुढे सेरोटोनिन आणि डोपामाइन सारख्या आनंदी संप्रेरकांची निर्मिती करण्यास मदत करते. यात काही आश्चर्य नाही, पौष्टिक आहार खाल्ल्याने हे जिवाणू आपला सतत बदलणारा स्वभाव नियंत्रित करायला मदत करतील व तुम्हाला नेहमीच उत्साहीत ठेवतील.

Is your diet making you depressed?
वजन कमी करण्यासाठी गुणकारी ठरते Green Coffee

"तुमचा आहार आणि भावनांमधील विशिष्ट दुवा तुमच्या मेंदू आणि तुमच्या जठरोगविषयक मार्गाच्या जवळच्या संबंधामुळे निर्माण होतो, ज्याला बहुतेकदा दुसरा मेंदू म्हटले जाते. तुमच्या अन्ननालिकेमध्ये कोट्यवधी सूक्ष्मजंतू असतात जे वाहून नेणाऱ्या न्यूरोट्रांसमीटरच्या निर्मितीवर परिणाम करतात. आतड्यांमधून मेंदूला संदेश मिळतो. पौष्टिक अन्नाचा वापर चांगल्या जीवाणूंच्या वाढीस उत्तेजन देतो, ज्यामुळे या रासायनिक पदार्थांच्या निर्मितीवर सकारात्मक परिणाम होतो. जेव्हा न्यूरोट्रांसमीटर उत्पादन चांगल्या स्थितीत असते, तेव्हा तुमच्या मेंदूला हे संदेश स्पष्टपणे मिळतात, आणि त्याचा सकारात्मक परिणाम तुमच्या भावानेवर होतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com