Goa Culture: भारतात गोवा हे राज्य पर्यटनाच्या बाबतीत अग्रेसर आहे. निसर्गसौंदर्याने नटलेला, मनाला शांत आणि आल्हाददायक समुद्रकिनारे अशी गोव्याची ओळख सर्वश्रूत आहे. हजारो पर्यंटक पर्यटनासाठी येतात. पण तुम्हाला गोव्याची दुसरी बाजू माहिती आहे का? ती म्हणजे गोव्यातील ऐतिहासिक व पोर्तुगीजकालीन मंदिरे, प्रशस्त प्राकार, आकर्षक स्थापत्यशैली, आजूबाजूचा परिसर स्वच्छ सुशोभित केलेली ही मंदिरे आहेत.
गोव्यातील मंदिरांनी धार्मिक संस्कृती, परंपरा, रीतीरिवाज जपताना हे स्थानिक लोक आपणाला बघायला मिळतात. त्यामुळे गोव्याची ही संस्कृती त्यांनी इतर राज्यांच्या तुलनेत अनोखी परंपरागत वारसा जपणारी दिसते. त्याचे प्रमुख कारण म्हणजे या मंदिरातील जत्रौत्सव व त्यात होणारे दिवजोत्सव.
कार्तिक पौर्णिमा झाली की गोव्यातील जत्रौत्सवाला सुरुवात होते साधारणतः जत्रौत्सव महाशिवरात्रीपर्यंत चालतात. जत्रौत्सवाचा आकर्षणाचा प्रमुख भाग म्हणजे दिवजोत्सव. दिवजोत्सव म्हणजे दिव्यांचा उत्सव असे आपण साध्या सोप्या शब्दात म्हणू शकतो.
दिवजा हे दोन प्रकारचे असतात एक मातीचे व दुसरे पितळचे. पण महिलांची अधिक पसंतीही पितळेच्या दिवजांना महत्त्व अधिक आहे कारण ते टिकाऊ व किफायतशीर असतात. पण काही ठिकाणी परंपरा म्हणून अजूनही मातीचे दिवजे वापरले जातात. या दिवजोत्सवात सुवासिनी महिला व कुमारिका फक्त भाग घेतात. या दिवजोत्सवात अनेक महिला सहभागी होतात.
सुवासिनी महिला नऊवारी साडी नेसून, दागदागिने घालून व पारंपरिक अशी वेशभूषा करून या दिवजोत्सवात महिला उत्साहाने भाग घेतात. मंदिराच्या प्राकारामध्ये या सुवासिनी महिला रांगेत उभे राहून, हातात किंवा डोक्यावर पेटते दिवजा घेऊन कोणतीही गडबड न करता शिस्तीत देवतेला ओवाळून मंदिराला एक प्रदक्षिणा घालतात. नवविवाहित जोडपे हातात दिवजा घेऊन फक्त पहिल्याच वर्षी आपल्या देवतेला ओवाळतात अशी प्रथा आहे. ठराविक समाजातील महिलांना हा दिवजोत्सव म्हणजे आनंदाची पर्वणीच असते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.