पश्चिम बंगालमधील दार्जिलिंगल हे शहर पर्वताची राणी (Queen Of Hills) म्हणून ओळखले जाते. या पर्वतांचे सौंदर्य पाहण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक (Tourists) येथे येतात. हे ठिकाण हनीमुनसाठी (Honeymoon) सर्वोत्तम मानले जाते. कोलकातापासून सुमारे 700 किमी अंतरावर असलेले हे शहर तुम्हाला वेड लावेल. चला तर मग जाणून घेऊया ऑफबीट डेस्टिनेशनबद्दल.
* कुर्सियांग
सिलीगुडीपासून केवळ 47 अंतरावर कुर्सियांग हे हिल स्टेशन आहे. येथील सुंदर नैसर्गिक दृश्ये प्रत्येकाला आकर्षित करतात. जर तुम्हाला शांत ठिकाणी जातचे असल तर या ठिकाणाला नक्की भेट द्या.
* जोरपोखरी
उंच पर्वत थंड वातावरणात वसलेले हे शहर दार्जिलिंगपासून 19 किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणी जाण्यासाठी ऑक्टोबर ते मार्च महिना चांगला मानला जातो. येथील निळ्या पाण्याचे सरोवर पाहून तुम्ही मंत्रमुग्ध व्हाल.
* लालकोठी
हे ठिकाण एकेकाळी ब्रिटिशांचे निवासस्थान होते. पण आता वन विभागाच्या जंगलामध्ये बदलले आहे.
* चटकपूर
उत्तरेकडील कांचनजंगा डोंगराने वेढलेल्या या छोट्या गावाजवळ एक वाहती नदी असल्याने हे ठिकाण अधिक आकर्षक बनले आहे. या ठिकाणी जाण्यासाठी तुम्ही टॅक्सीची मदत घेवू शकता.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.