WhatsAppवर कामासंबधित डॉक्यूमेंट शोधायचेत? ही आहे प्रक्रिया

तुम्हालाही व्हॉट्सअॅपवर कामासंबंधित महत्वाचे डॉक्यूमेंट शोधायचे असेल तर पुढील ट्रिकचा वापर करू शकता.
WhatsApp
WhatsAppDainik Gomantak

WhatsApp: व्हॉट्सअॅपचा वापर केवळ चॅटिंगसाठीच नाही तर कॉलिंग आणि फाइल शेअरिंगसाठीही केला जातो. तुम्ही महत्वाचे डॉक्यूमेंट्स शेअर करण्यासाठी देखील WhatsApp देखील वापरू शकता. तुम्हाला कधी व्हॉट्सअॅपवर शेअर केलेल्या डॉक्यूमेंट्स शोधण्यात अडचण आली आहे का? जर होय, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. तुम्ही पुढील ट्रिक वापरून सहज डॉक्यूमेंट्स सर्च करू शकता.

व्हॉट्सअॅपवर डॉक्युमेंट्स कसे सर्च कराल?

तुम्हाला माहिती आहे का, व्हॉट्सअॅपवर शेअर केलेले डॉक्युमेंट्स एका लिस्टमध्ये एकत्र तपासले जाऊ शकतात. तुम्ही एकाच ठिकाणाहून व्हॉट्सअॅपवर वेगवेगळ्या संपर्कांसह शेअर केलेले डॉक्युमेंट्स अॅक्सेस करू शकता.

व्हॉट्सअॅपवर यूजर्सना कागदपत्रे शोधण्याची सुविधा मिळते. या फीचरच्या मदतीने तुम्ही एकाच वेळी व्हॉट्सअॅपवर वेगवेगळ्या चॅटसह शेअर डॉक्युमेंट सर्च करू शकता.

असे करा सर्च

सर्वात पहिले तुम्हाला व्हॉट्सअॅप ओपन करावे लागेल.

नंतर तुम्हाला वरच्या उजव्या कोपर्‍यात थ्री डॉट ऑप्शनच्या डाव्या बाजूला सर्च आयकॉनवर टॅप करावे लागेल.

नंतर Unread, Photo, च्या यादीत Documents ऑप्शन दिसेल.

तुम्हाला Documents या पर्यायावर टॅप करावे लागेल.

तुम्ही या पर्यायावर टॅप करताच, तुम्ही शेअर केलेल्या फाइल्स PDF, Doc, JPG फॉरमॅटमध्ये चेक करू शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com