आपले सुंदर आयुष्य डोळ्यांशिवाय अपूर्णच आहे. डोळ्यांमुळे आपण जगाला निखारतो आणि आपले जीवन सुखकर होते. Work from Home करताना बऱ्याचदा आपल्याला वेळेपेक्षा जास्त काम करावे लागते, आणि त्याचा सर्वात वाईट परिणाम डोळ्यांवर होत आहे. सतत तासनतास कॉम्प्युटर स्क्रीनवर वेळ घालवणे डोळ्यांसाठी खूप प्रमाणात हानी करते. (Tears in your eyes if you spend too much time on computer These tips will reduce the pain)
आजही आपल्यापैकी बहुतांश लोक घरूनच काम करतात आणि त्यामुळे आपली नजर खूपच कमकुवत होत चालली आहे. मात्र, घरून काम न करणाऱ्यांनाही डोळ्यांचा त्रास कमी नाहीये, कारण हे लोकही नेहमी मोबाइल आणि टीव्हीला दिवसेंदिवस चिकटलेले असतात. मग आपण आपले डोळे निरोगी कश्या प्रकारे ठेवू शकतो? डोळे निरोगी ठेवण्यासाठी आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत, त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे.
लॅपटॉप, कॉम्प्युटर पुरेशा अंतरावर ठेवून काम करा
कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवर काम करताना ते पुरेशा अंतरावर ठेवून काम करा. तुम्ही ते डोळ्यांपासून जितके दूर ठेवाल तितका त्याचा परिणाम कमी होणार आहे. सामान्यतः असे दिसून येते की जे लोक स्क्रीन जवळ ठेवून काम करतात, त्यांच्या डोळ्यांना खूप त्रास होतो, डोळ्यातून पाणी येतं आणि अंधुक दिसू लागतं, अनेकांना डोळ्यांची जळजळ सुरू होते, त्यामुळे संगणक किंवा लॅपटॉपची स्क्रीन डोळ्यांपासून किमान 25 इंच दूरवर ठेवून काम करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.