Tea Time Snack: टी टाईमसाठी परफेक्ट आहे भातापासून बनवलेले मुठिया,नोट करा रेसिपी

जर तुम्हाला चहासोबत काहीतरी खायाचे असेल तर उरलेल्या भातापासून स्वादिष्ट मुठिया बनवु शकता.
Tea Time Snack
Tea Time SnackDainik Gomantak
Published on
Updated on

Tea Time Snack: पावसाळ्यात संध्याकाळच्या चहासोबत चटपटीत नाश्ता खायला सर्वांनाच आवडतो. पण डीप फ्राय आणि तेलात बनवलेले स्नॅक्स आरोग्यासाठी फायदेशीर नसते. अशावेळी अनेकदा फक्त बिस्किटे खाऊन भूक भागवली जाते.

स्नॅक्सशिवाय चहाची मजा येत नसेल तर तुम्ही उरलेल्या भातापासून मुठिया बनवून झटपट टेस्टी नाश्ता बनवु शकता. तेलात न तळता या मुठियाची चव अप्रतिम असून बनवायला देखील सोपे आहे.

  • भाताचे मुठिया बनवण्यासाठी लागणारे साहित्य

शिजवलेला भात 2 कप

बेसन 1 वाटी

गव्हाचे पीठ 1/2 कप

दही 1/2 कप

हिरव्या मिरचीची पेस्ट 1चमचा

आल्याची पेस्ट 1 चमचा

भाजलेली धने-जिरे पावडर 1चमचा

लाल तिखट 1 चमचा

हळद 1/2 चमचा

चवीनुसार मीठ

साखर 1चमचा

कोथिंबीर बारीक चिरलेली

तेल 1 चमचा

बेकिंग सोडा 1/2 चमचा

मोहरी 1 चमचा

जिरे 1 चमचा

हिंग 1चमचा

पांढरे तीळ 1 चमचा

कढीपत्त्याचे काही पान

Tea Time Snack
Monsoon Care For Oily Skin: पावसाळ्यात अशी घ्या तेलकट चेहऱ्याची काळजी
  • भाताचे मुठिया बनवण्याची कृती

सर्वात पहिले एका भांड्यात शिजवलेला भात काढावा. त्यात बेसन, गव्हाचे पीठ घालावे. सोबत हिरवी मिरचीची पेस्ट, आले पेस्ट, जिरे-धणे पावडर घालावे. त्यात हळद, मीठ, साखर, दही घालून मिक्स करावे.

नंतर बेकिंग सोडा एकत्र घालून छोटे गोळे चांगले बांधून घ्यावे. पाणी गरम करून वाफेवर हे सर्व मुठिया वाफवुन घ्यावे. शिजल्यावर त्याचे छोटे तुकडे करावेत. या तयार मुठियावर आता तडका द्यावा.

तडका तयार करण्यासाठी पॅन गॅसवर ठेवा आणि तेल टाकावे. त्यात मोहरी आणि जिरे टाकावे. तसेच हिंग आणि कढीपत्ता घालावे. सर्वात शेवटी तीळ टाका आणि गॅस बंद करा आणि हा तडका तयार केलेल्या मुठियावर टाका. तेलात न तळता हेल्दी स्नॅक्स तयार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com