Health Tips: तुम्हाला चहासोबत सिगारेट ओढण्याची सवय असेल, तर सावधान!

चहासोबत अनेकजण विविध गोष्टींचे सेवन करतात.
Tea and Cigarette Side Effects on Health
Tea and Cigarette Side Effects on Health Dainik Gomantak

Tea and Cigarette Side Effects on Health

आपल्यापैकी अनेकांना चहा आवडतो. चहासोबत अनेकजण विविध गोष्टींचे सेवन करतात. त्यापैकीच एक म्हणजे चहासोबत खुपजण सिगारेट ओढतात. याचे आपल्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम होऊ शकतात.

अनेक शास्त्रज्ञांनी याबाबत केलेल्या संशोधनातून याचे शरीरावर होणारे दुष्परिणाम नमूद केले आहेत.

Tea and Cigarette Side Effects on Health
Goa Live Updates: 'व्होकल फॉर लोकल'चे मुख्यमंत्र्यांनी केले आवाहन...

चहा किंवा कॉफीसोबत सिगारेट ओढू नये, कारण....

जर तुम्हाला चहा किंवा कॉफी सोबत सिगारेट ओढण्याची सवय असेल तर याचा अर्थ तुम्ही एकाच वेळी दोन मादक पदार्थांचे सेवन करत आहात. एक व्यसन कॅफीनचे आहे आणि दुसरे सिगारेटचे आहे. चहा आणि कॉफी या दोन्हीमध्ये कॅफिन असते. जेव्हा तुम्ही कॅफिनसोबत सिगारेट ओढता तेव्हा त्याचा तुमच्या फुफ्फुसावर वाईट परिणाम होतो.

सिगारेटमधून निघणाऱ्या धुरात कार्बन मोनॉक्साईड वायू असतो, ज्यामुळे रक्तातील ऑक्सिजनची पातळी कमी होते. इतकंच काय, कॉफी आणि चहासोबत सिगारेट ओढली की परिस्थिती आणखीनच गंभीर बनते. याचा परिणाम फक्त तुमच्या फुफ्फुसांवरच होणार नाही, तर शरीराच्या इतर अवयवांवरही नकारात्मक परिणाम होईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com