Goa: त्वचेची काळजी घ्या

Goa: पावसाळ्यात त्वचेची (Skin) काळजी कशी घ्यावी, याबद्दल मार्गदर्शनपर माहिती...
Goa: Skin
Goa: SkinDainik Gomantak
Published on
Updated on

Goa: त्वचा आपल्या आरोग्याचा आरसा आहे, असे म्हटले जाते. नितळ व तजेलदार त्वचा हे आपण निरोगी असल्याचे एक लक्षण आहे. बाह्य वातावरणापासून शरीराचे रक्षण करणारे संरक्षक कवच म्हणजे आपली त्वचा. शरीरात होणाऱ्या बदलांचा तसेच वातावरणातील उष्णता, शैत्य, वारा, प्रदूषण, रासायनिक सौंदर्य प्रसाधने तसेच बदलते वयोमान यांचे परिणाम त्वचेवर होताना दिसतात. उदा. शीत वाऱ्याच्या स्पर्शाने त्वचा कोरडी ( Dry skin ) होते. त्याचप्रमाणे ऋतूनुसार काही परिणाम त्वचेवर होतात व अवस्थानुरूप त्वचेची योग्य निगा राखली गेली नाही तर वेगवेगळे त्वचारोग निर्माण होऊ शकतात. त्यांपैकी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात त्रस्त करणारा त्वचारोग म्हणजे गजकर्ण (Ringworm infection) (रिंगवर्म इन्फेक्शन). या त्वचारोगामध्ये त्वचेवर गोलाकार चट्टे उठतात, त्यांच्या कडा लालसर असतात व काही दिवसांनी त्यात पापुद्रे तयार होतात व त्या भागाला तीव्र खाज सुटते. डोक्याची त्वचा, मनगटे, काखा, जांघा, स्तन, नितंब, हातापायांच्या बोटांमधील जागा इ. भागांत हे चट्टे उठतात. आयुर्वेदात 'दद्रु' या नावाने या रोगाचे वर्णन आहे. हा संसर्गजन्य - म्हणजे एका व्यक्तिपासून दुसऱ्या व्यक्तीला होणारा आजार आहे. तसेच गजकर्ण प्राण्यांपासून सुध्दा या रोगाचा संसर्ग Take care of the skin
होऊ शकतो.

गजकर्णाची मुख्य कारणे कोणती ?
ओलावा ः बऱ्याच वेळा पावसाळ्यात कपडे ओलसर राहतात. असे ओले कपडे वापरल्याने फंगल ग्रोथ चे प्रमाण वाढते.
शारीरिक अस्वच्छता ः एकदा घातलेले कपडे न धुता परत वापरणे, रोज आंघोळ न करणे.
संसर्गित व्यक्तिचे कपडे, कंगवा, सौंदर्य प्रसाधने, टॉवेल, इ. वस्तू वापरणे
कमजोर व्याधिक्षमता ः दीर्घकालीन आजारामुळे रोगप्रतिकार शक्ती कमजोर असणे.
विरुद्ध आहार ः नियमित खाणे. उदा. दूध व फळे/आंबट पदार्थ, दूध व मांसाहार एकत्र खाणे, दही गरम करून (मांसाहार मेरिनेट करताना) किंवा दही रात्री खाणे.

Goa: Skin
'सावळा रंग' चित्रपट मिळवण्यात अडचण; 'या' अभिनेत्रीने केला खुलासा

गजकर्ण होऊ नये म्हणून काय करावे ?
१. दररोज अंघोळ करावी, शारीरिक स्वच्छता ठेवावी.
२. स्वच्छ, सैलसर, सुती कपडे परिधान करावे. सिंथेटिक कपडे वापरू नये.
३. पावसाळ्यात कपडे नीट वाळावे यासाठी कपड्यांवर गरम इस्त्री फिरवावी.
४. वस्त्रधूपन - कडूनिंब, हळद, दूर्वा, भीमसेनी कापूर, धूपाचे खडे, गोवऱ्या यांचा धूर कपड्यांना द्यावा. नित्य अभ्यंग करावे.
५. साबणा ऐवजी जंतुघ्न द्रव्यांपासून बनवलेले उटणे वापरावे. उटण्यासाठी नागरमोथा २ भाग, वेखंड १ भाग, कडूनिंब १ भाग, गुलाब पाकळ्या १ भाग, संत्रासाल १/२ भाग, मसूर डाळ पीठ किंवा बेसन ६ भाग अशी चूर्णे एकत्र करून वापरावी.
६. रोगप्रतिकारक शक्ति वाढवण्यासाठी ऋतुनुसार सकस आहार सेवन करावा.
७. घरातील प्रत्येक व्यक्तीचा टॉवेल, कंगवा, सौंदर्य प्रसाधने वेगळी असावी
८. गजकर्ण झालेल्या जनावरांना / माणसांना स्पर्श केल्यास हात स्वच्छ धुवावे.
९. बाहेरून आल्यानंतर हात पाय स्वच्छ धुवून कोरडे करावे, विशेषतः पायांच्या बोटांमधील जागा.
आयुर्वेदात या रोगावर प्रभावी चिकित्सा आहे. त्वचारोग तीव्र स्वरूपाचा असल्यास पंचकर्मातील उपचार केले जातात. विविध औषधांचा आभ्यंतर तसेच बाह्य लेपनार्थ प्रयोग केला जातो. निसर्ग हे ईश्वराने मानवाला दिलेलं अनमोल वरदान आहे. निसर्गातील नियमबद्धता आणि सुव्यवस्था अचंबित करणारी आहे. ज्या ऋतूत जे जे व्याधी उद्भवू शकतात, त्या त्या व्याधींचे औषध निसर्गात त्या ऋतूत निर्माण होत असते.
वर्षाऋतूत होणाऱ्या गजकर्ण या चक्राकार त्वचारोगावरचे उत्तम औषध म्हणजे टाकळा (तायकिळा). याला संस्कृत भाषेत चक्रमर्द - म्हणजेच चक्राकार रोग नाहीसा करणारा असं नाव आहे. तायकिळा पावसाळ्यात मुबलक प्रमाणात उगवतो. या भाजीचा योग्य प्रमाणात आहारात वापर करावा. तसेच बाहव्याची पाने या गजकर्ण रोगावर
उपयुक्त आहे. अश्या या रानभाज्या व वनस्पतींचं संरक्षण करणे आज काळाची गरज आहे. जेणेकरून वैद्यांच्या मार्गदर्शनाने खात्रीशील व कोणतेही अपाय नसलेली नैसर्गिक औषधे वापरून विविध त्वचारोगांचा नायनाट करता येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com