उन्हाळ्यात पक्ष्यांची घ्यावी काळजी

अंगणात किंवा बाल्कनीत पाणी ठेवून मात्र आपण त्यांना मदत करू शकतो.
Summer |Goa
Summer |GoaDainik Gomantak
Published on
Updated on

उन्हाळी फळांचे मोसम सुरू झाले की पक्षी आणि प्राणी झाडांमध्ये पसरून असलेल्या मधुर सुवासाने ललचावून जात असतील. माणूस आणि त्यांच्या मधला फरक इतकाच असतो की त्यांना बाजारात जाऊन ‘कशे दिल्या गे डझन?’ असे विचारावे लागत नाही. यंदाच्या वर्षी युक्रेन आणि रशियाचे युद्ध चालू आहे. त्यामुळे पेट्रोलची (Petrol) टंचाई निर्माण झाली आहे त्यामुळे पेट्रोल महाग झाले आहे त्यामुळे वाहतूक खर्च वाढला आहे, त्यामुळे बाजारात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीच महाग झाल्या आहेत व त्यामुळे आंबे फणसही महागले आहेत इत्यादी ‘त्यामुळे’ निर्माण करणाऱ्या साखळीशी त्यांचे किंचितही सोयरसुतक नसते.

उन्हाळ्यात पक्ष्यांना वाचवा : उन्हाळा (Summer) हा उष्णतेचा यज्ञकुंडच बनलेला असतो. माणसांप्रमाणेच पक्षी-प्राण्यांनाही या हवामानाशी जुळवून घेणे कठीण जाते. संपूर्ण उन्हाळ्यात स्थानिक वृक्षवल्ली त्यांच्यासाठी अन्नाचा स्रोत बनवून उभ्या असतात. काही झाडमालक या पक्ष्यांना उपद्रवी समजतात कारण त्यांना वाटते की त्यांच्यामुळे त्यांच्या मालमत्तेचे नुकसान होते. ते या पक्ष्यांना आपल्या झाडांवर येण्यापासून आणि झाडावरची फळे खाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी अनेकदा ते झाडांची छाटणी करतात व पक्ष्यांची घरटीही उद्‌ध्वस्त करतात. तसे करणे पूर्णपणे चुकीचे असते.

पक्षी आणि प्राणीही या निसर्गमातेचे (nature) भाग आहेत आणि या निसर्गावर आपल्यापेक्षा त्यांचा अधिक अधिकार आहे. पक्ष्यांना बियाणे खायला घालण्याची खरोखरच आवश्यकता नसते कारण ते आपले अन्न शोधू शकतात. अंगणात किंवा बाल्कनीत पाणी ठेवून मात्र आपण त्यांना मदत करू शकतो. उन्हाळ्यात घरटी बांधण्यासाठी पक्षी एखादी लहानशी जागा ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा आपण शांत राहून त्याच्या त्यांच्या निर्मितीचा आनंद घ्यायला हवा.”

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com