Sunday Special: आयुष्यात निरोगी आरोग्यासह यश हवे असेल तर रविवारी सूर्याच्या 'या' मंत्राचा करावा जप

Ravivar Special: धार्मिक मान्यतेनुसार सूर्यदेवाची मनोभावे पुजा केल्याने आयुष्यात यश आणि निरोगी शरीर मिळते.
Successful Life
Successful LifeDainik Gomantak
Published on
Updated on

sunday special these powerfull mantras of surya dev chant on sunday for blessing success

रविवार हा दिवस सुर्यदेवाला समर्पित असतो. रविवारी मनोभावे सुर्यदेवाची पुजा केल्यास आणि दररोज सूर्योदयाच्या वेळी अर्घ्य दिल्यास मान-सन्मान, नोकरीत प्रगती आणि अनेक कामांमध्ये यश मिळते. जर तुम्हाला दररोज हे जमत नसेल तर किमान दर रविवारी सूर्यपूजेसोबत तांब्याच्या भांड्यात लाल फुले टाकून सूर्यदेवाला जल अर्पण करावे.


सूर्यदेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी काही विशेष मंत्रांचा जप करावा. या मंत्राचा जप केल्याने आयुष्यात प्रगती होऊ शकते. हे मंत्र कोणते आहेत हे जाणून घेऊया.

ओम ह्रं मित्राय नम:

या मंत्राचा जप केल्याने काम करण्याची क्षमता वाढते.

ओम ह्रीं रविये नम:

जर एखाद्या व्यक्तीला क्षयरोग झाला असेल तर त्याने बरे होण्यासाठी सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करताना या मंत्राचा जप करावा.

ओम हूं सूर्याय नम:

अर्घ्य देताना या मंत्राचा जप केल्याने बुद्धिमत्तेत वाढ होण्यासह मानसिक शांती मिळते.
 
ओम ह्रं भनवे नम:

या मंत्राचा जप केल्याने मूत्राशय संबंधित समस्या दूर होतात.
 
ओम ह्रौं खगाय नम:

जो व्यक्ती अर्घ्य अर्पण करताना या मंत्रांचा जप करतो, त्याच्या शरीरात तसेच बुद्धीला एक वेगळी ऊर्जा प्राप्त होते.
 

ओम ह्रीं: पुषणे नमः

या मंत्राचा जप केल्याने व्यक्तीचे मन धार्मिक कार्यात अधिक व्यस्त होते. यामुळे शक्ती आणि कार्य क्षमता देखील वाढते.
 
ओम ह्रं हिरण्यगर्भाय नमः

या मंत्राचा जप केल्याने शारीरिक, बौद्धिक आणि मानसिक शक्ती वाढते असे मानले जाते.
 
ओम मारिच्ये नमः

या मंत्राचा जप केल्याने सर्व रोगांपासून मुक्ती मिळते.
 
ओम आदित्यय नमः

धार्मिक मान्यतेनुसार या मंत्राचा जप करणाऱ्या व्यक्तीला आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळते.
 
ओम सावित्रे नमः

ज्योतिषांच्या मते, या मंत्राचा जप केल्याने सूर्यदेवाची कृपा सदैव राहते. तसेच व्यक्तीचा आदरही वाढतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com