Mango Peda Recipe: उन्हाळ्यात चाखा आंब्यापासून बनवलेल्या पेढ्याची चव ! आजच ट्राय करा रेसिपी

आंबा पेढ्या बनवणे फार सोपे आहे. तुम्ही काही दिवस स्टोअर करुन देखील ठेउ शकता.
Mango Peda Recipe
Mango Peda RecipeDainik Gomantak

Mango Peda Recipe: उन्हाळ्यात आंबा खाण्याची मज्जाच वेगळी असते. आंबा हा फळांचा राजा सर्वांनाच प्रिय आहे. आंब्याची चव, सुवास तर चांगलाच असतोच त्यासोबत आंब्याचे अनेक फायदेही आहेत. आंबा अनेकांना असच खायला आवडतो. पण उन्हाळ्यात त्यापासून वेगेवगेळे पदार्थही बनवले जातात.

तुमच्या कुटुंबातील सदस्यांना मिठाई खायला आवडत असेल तर तुम्ही त्यांच्यासाठी आंब्याचा पेडा बनवू शकता. आंबा पेढ्याची रेसिपी फार सोपी आहे. हे पेढे तुम्ही फ्रिजमध्ये काही काळासाठी स्टोअरही करू शकता.

  • लागणारे साहित्य

मँगो प्युरी - 3 ते 4 कप

दूध पावडर- 3 ते 4 कप

बदाम - 10 ते 12

तूप - 3 चमचे

साखर - 1/4 कप

विलायची पावडर - 1 मोठी चिमूटभर

पिस्ता - सजवण्यासाठी

नट किंवा सिल्व्हर फॉइल - सजवण्यासाठी

खाद्य रंग - एक चिमूटभर

केशर - एक चिमूटभर

कंडेंस्ड मिल्क - 3 ते 4 कप

Mango Peda Recipe
Vitamin B7 Deficiency: 'या' एका व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे डोळ्यांचे आरोग्य येउ शकते धोक्यात
  • कृती

आंब्याचा पेडा बनवण्यासाठी सर्कवात पहिले कढईत तूप घेऊन गरम करा. आता कंडेन्स्ड मिल्क आणि मिल्क पावडर मिक्स करुन घट्ट होईपर्यंत शिजवा.

चांगले शिजल्यावर ताटात काढा. आता दुसर्‍या पॅनमध्ये तूप गरम करून त्यात कैरीची प्युरी, केशर आणि वेलची पूड घालून चांगले शिजवून घ्या. ते शिजल्यावर त्यात आधी शिजवलेले कंडेन्स्ड मिल्क आणि मिल्क पावडर मिक्स करा.

आता ते सतत ढवळत राहा. घट्ट झाल्यावर प्लेटमध्ये काढून घ्या. थंड झाल्यावर पेढे बनवा. झाडे सजवण्यासाठी पिस्ता, केशर धागे आणि नट किंवा अगदी चांदीचा पन्ना वापरा. पेडा बनल्यावर सेट करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com