थंडी संपून उन्हाळा सुरू झाला आहे. या हंगामात प्रत्येकाला स्टायलिश आणि कूल दिसायचे असते. पण उन्हाळ्यात स्वत:ला स्टायलिश ठेवण्यासोबतच आरामदायक वाटणंही महत्त्वाचं आहे. तुम्हाला या उन्हाळ्यात स्टायलिश आणि कूल दिसायचे असेल तर तुम्ही पुढील फॅशन टिप्स फॉलो करू शखकता.
हलके आणि आरामदायक कपडे परिधान करा
उन्हाळ्यात कॉटन आणि लिननचे कपडे घालून मुली सुंदर आणि आरामदायक राहू शकतात. लाँग प्रिंटेड कपडे, शॉर्ट्स आणि टॉप्स किंवा जंपसूट छान दिसतात. लिनेन पँट आणि ओपन ब्लाउज देखील खूप आरामदायक आणि स्टाइलिश दिसतात.
कमी मेकअप
उन्हाळ्यात लाइट मेकअप करणे चांगले असते. कारण घामामुळे मेकअप निघून जाऊ शकतो. तुम्ही जर उन्हाळ्यात एकाद्या कार्यक्रमात जाणार असाल तर वॉटरप्रूफ मेकअप प्रोडक्ट वापरावे.
सनग्लासेस आणि हॅट्स
उन्हाळ्यात स्टायलिश सनग्लासेस आणि क्युट हॅट्स घातल्यास उन्हापासून संरक्षण तर होतोच, शिवाय तुम्ही अधिक स्टायलिशही दिसता. सनग्लासेसची चांगली जोडी तुमच्या डोळ्यांना तीव्र सूर्यप्रकाशापासून वाचवते आणि टोपी सूर्यापासून तुमच्या डोक्याचे रक्षण करते.
आरामदायी फुटवेअर
उन्हाळ्यात पायांनाही थंडपणा आणि आराम हवा असतो. म्हणून, लाइट आणि आरामदायी चप्पल घालणे चांगले. तुम्ही समुद्रकिनाऱ्यावर किंवा बाजारात जात असलात तरीही, स्टायलिश फ्लिप-फ्लॉप्स, स्लाइड्स किंवा स्ट्रॅपी सँडल गालू शकता.
या ॲक्सेसरीज घाला
उन्हाळ्यात तुमचा लूक खास बनवण्यासाठी लाइट ॲक्सेसरीज वापरावी. बीड्स, लाइट कानातले आणि सुंदर हलके ब्रेसलेट घालावे. या सर्व गोष्टी तुम्हाला स्टायलिश दिसण्यास मदत करतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.