Summer Diet Tips: उन्हाळ्यात फिट अन् हेल्दी राहण्यासाठी आजच फॉलो करा 'या' टिप्स

उन्हाळ्यात निरोगी राहण्यासाठी तुम्ही हे सिंपल फंडे नक्की ट्राय करु शकता.
Summer Diet Tips
Summer Diet TipsDainik Gomantak

Summer Diet Tips: उन्हाच्या झळा बसायला सुरुवात झाली आहे. वातावरणातील होणार्या बदलांमुळे अनेक आजार डोके वर काढतात.

त्याच वेळी, संसर्गाचा धोका देखील कायम राहतो. या बदलत्या ऋतूमध्ये फ्लू, व्हायरल सर्दी, सर्दी यांसारख्या समस्या उद्भवतात. अशा वातावरणात कोणती काळजी घ्यावी जाणुन घेउया.

नेहमी न्याहारी केल्यानंतर बाहेर पडावे

जेव्हाही तुम्ही सकाळी घरातून बाहेर पडता तेव्हा नाश्ता केल्यानंतरच बाहेर पडा. यामुळे तुम्हाला दिवसभर उत्साही वाटेल.सकाळी चहा आणि कॉफीऐवजी ग्रीन टी घेऊ शकता. याशिवाय उपमा, दलिया आणि फळे सकाळी खाऊ शकतात.

योग्य प्रमाणात पाणी प्यावे

उन्हाळ्यात भरपुर पाणी गरजेचे आहे. अनेकदा डिहायड्रेशनची समस्या उद्भवते. हे टाळण्यासाठी दररोज थोड्या-थोड्या वेळाने पाण्याचे सेवन करत राहा. शरीरात पाण्याची कमतरता असल्यास चक्कर येणे, डोकेदुखी, उलट्या होणे अशा तक्रारी होऊ शकतात. उन्हाळ्यात 7 ते 8 लिटर पाणी प्यावे. 

ज्यूसचे सेवन करा

उन्हाळ्यात उष्माघातापासून बचाव करण्यासाठी थंडपेयाऐवजी ताज्या रसाचे सेवन करावे. जसे की संत्र्याचा रस, काकडी, टोमॅटोचा रस पिऊ शकता. यामुळे शरीर थंड राहण्यास मदत होईल.

Summer Diet Tips
Summer Skin Care: उन्हाळ्यात चेहऱ्यावर लावा चंदन, त्वचेच्या समस्या होतील दुर

मसालेदार पदार्थ खाणे टाळा

मसालेदार पदार्थ खाणे टाळावे. कारण त्याचा प्रभाव उष्ण असतो आणि उन्हाळ्यात शरीर खूप गरम झाल्यास अनेक समस्या उद्भवू शकतात. यामध्ये मुरुम, उलट्या आणि खराब पचनसंस्था यांचा समावेश होतो.

थंड पाणी पिणे टाळा

बरेच लोक जास्त गरम झाल्यावर थंडगार पाणी किंवा बर्फ घालून पाणी पितात, हे देखील टाळावे. त्याऐवजी, तुम्ही फ्रेश ज्युसचे सेवन करु शकता. शरीराचे सामान्य तापमान 37 अंश सेल्सिअस असते आणि जेव्हा तुम्ही खूप कमी तापमान असलेली एखादी वस्तू सेवन करता तेव्हा तुमचे शरीर हे तापमान नियंत्रित करण्यासाठी ऊर्जा खर्च करून त्याची भरपाई करते. 

बाहेरून आल्यानंतर आंघोळ करणे टाळा

जर तुम्ही उन्हाळ्यात बाहेरून आला असाल तर लगेच आंघोळ करू नका. बाहेरून आल्यानंतर शरीराचे तापमान खूप जास्त असते. शरीरावर पाणी पडल्याने शरीराचे तापमान बिघडते, सर्दी, सर्दी, डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com