Summer Bathing Tips: उन्हाळ्यात आंघोळीच्या पाण्यात मिक्स करा 'या' गोष्टी, दिवसभर वाटेल फ्रेश

नियमितपणे आंघोळीच्या पाण्यात काही गोष्टी मिक्स केल्यास दिवसभर फ्रेश राहण्यास मदत होईल.
Bath
BathDainik Gomantak

Summer Bathing Tips: उन्हाळ्यात घामामुळे केस आणि त्वचा चिकट होतात. सूर्यप्रकाश, घाम आणि धूळ यामुळे उन्हाळ्यात फ्रेश वाटत नाही. सारखी अंघोळ करावीशी वाटते. कारण आंघोळीनंतर मन फ्रेश तर होतेच, शिवाय बॅक्टेरिया आणि जंतूपासून मुक्ती मिळते.

पण सकाळी आंघोळ केल्यावर दिवसभर फ्रेश दिसण्यासाठी या टिप्स फॉलो करा. तुम्ही अंघोळीच्या पाण्यात काही गोष्टी मिक्स करुन आंघोळ करू शकता. यामुळे तुम्हाला फ्रेश तर वाटेलच त्या सोबत खाज येणे इत्यादी समस्याही दूर राहता येते.

  • हळद

हळदीमध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-एजिंग सारखे अनेक गुणधर्म देखील असतात. ते पाण्यात मिक्स करुन आंघोळ केल्यास उन्हाळ्यात दिवसभराचा थकवा आणि खाज सुटणे इत्यादीपासून आराम मिळतो.

तसेच पुरळ आणि मुरुम यासारख्या त्वचेच्या समस्याही दूर राहतील. एवढेच नाही तर त्वचेवर चमकही येईल. या पाण्याने अंघोळ केल्याने त्वचेच्या टॅनिंगची समस्याही दूर होईल.

हळद
हळदDainik Gomantak
Bath
Summer Cold Drink For Diabetes: उन्हाळ्यात मधुमेह असणाऱ्या लोकांनी घ्यावा 'या' 4 शीतपेयांचे सेवन
  • गुलाबाच्या पाकळ्या

उन्हाळ्यात आंघोळीच्या पाण्यात 1 तास आधी ताज्या गुलाबाच्या पाकळ्या टाकल्या आणि या पाण्याने अंघोळ केली तर तुम्हाला दिवसभर ताजेतवाने वाटते. हे तुम्हाला मानसिकदृष्ट्या फ्रेश ठेवण्यासाठी देखील काम करेल. यामुळे तुमचा मूडही दिवसभर चांगला राहील. त्वचेच्या दुर्गंधीची समस्याही दूर होईल.

rose water
rose waterDainik Gomantak
  • कडुनिंब

कडुनिंबात अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात जे त्वचेसाठी खूप फायदेशीर असतात. उन्हाळ्यात आंघोळीच्या पाण्यात कडुलिंबाची पाने किंवा कडुलिंबाचे तेल मिक्स वापरू शकता. कडुलिंब किंवा त्याच्या तेलामुळे त्वचेवर खाज सुटणे, पुरळ येणे इत्यादी समस्या होत नाहीत आणि तुम्हाला दिवसभर ताजेतवाने वाटते.

Neem Tree
Neem TreeDainik Gomantak
  • उन्हाळ्यात घ्यावी खास काळजी

सनस्क्रीन वापरेवे

प्रत्येक ऋतूमध्ये चेहऱ्याला सनस्क्रीन लावणे गरजेचे आहे. या ऋतुमध्ये सनस्क्रीनऐवजी एसपीएफ असलेले मॉइश्चरायझरही लावणे चांगले असते. पण उन्हाळ्यात या प्रकारची क्रीम त्वचेला तेलकट आणि निस्तेज लुक देऊ शकते. उन्हाळ्यात जेल-आधारित सनस्क्रीन किंवा उच्च एसपीएफ असलेली स्प्रे वापरणे चांगले असते.

सीरम

उन्हाळ्यात तुमच्या त्वचेच्या (Skin) गरजेनुसार सीरम निवडा, ज्यामुळे त्वचा हायड्रेट राहील.

क्लीन्सर

उन्हाळ्यात त्वचा स्वच्छ करण्यासाठी क्लीन्सरचा वापर करावा. परंतु आजकाल त्वचेवरील प्रदूषण आणि डेड स्किन काढून टाकण्यासाठी क्ले बेस्ड क्लेंजरचा वापर केला जातो. यामुळे त्वचा स्वच्छ आणि चमकदार दिसते.

केस धुणे

उन्हाळ्यात इतर ऋतूंच्या तुलनेत जास्त केस धुण्याची गरज असते. कारण केस खुप लवकर तेलकट होतात. त्यामुळे आठवड्यातून 3 वेळा केस धुणे चांगले होईल, जेणेकरून कोंडा आणि इतर समस्या दूर राहतील.

मिस्ट स्प्रे

मिस्ट स्प्रे त्वचेला ताजे आणि हायड्रेट ठेवते. उन्हाळ्यात त्वचेवर जास्त घाम येतो तेव्हा याचा वापर केल्याने चेहरा फ्रेश दिसतो.

फेस मास्क

शीट मास्कचे कूलिंग गुणधर्म उन्हाळ्यात त्वचा ताजे ठेवण्यासाठी चांगले आहेत. जे सनबर्न आणि लहान ब्रेकआउट्सची समस्या दूर करते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com