Headache: डोकेदुखी ही बहुतेक लोक त्यांच्या आयुष्यात अनेकदा अनुभवतात. डोकेदुखी म्हणजे तुमच्या डोक्यात सौम्य किंवा तीव्र होणारी वेदना होय. सततच्या डोकेदुखीने अनेकजण त्रस्त असतात. पण ही डोकेदुखी नेमक्या कोणत्या प्रकारची आहे हे आपल्यााला माहित नसते.
वेदनांच्या तीव्रतेवरल आधारावर डोकेदुखीचे तीन प्रमुख प्रकार केले जातात.
प्राथमिक डोकेदुखीदुय्यम डोकेदुखी
दुय्यम डोकेदुखी
क्रॅनियल मज्जातंतुवेदना, चेहर्यावरील वेदना आणि इतर डोकेदुखी
मायग्रेन
हा डोकेदुखीचा पहिला प्रकार आहे. जेव्हा आपलं डोकं, मायग्रेनमुळे दुखू लागतं तेव्हा आपल्याला डोक्याच्या कोणत्याही एका बाजूला वेदना होतात. तसेच मायग्रेनचा त्रास बहुतांश महिलांना उद्भवतो.
या डोकेदुखीचा परिणाम डोळ्यांच्या दृष्टीवरही होऊ शकतो. मायग्रेनचा त्रास असलेले रुग्ण प्रकाश आणि आवाजासाठी खूप संवेदनशील असतात. म्हणजेच मायग्रेनची समस्या असलेल्या रुग्णांना प्रकाश आणि आवाजाचा त्रास होतो.
क्लस्टर
क्लस्टर डोकेदुखीचा परिणाम डोळ्यांवर स्पष्टपणे दिसून येतो. हे अधूनमधून घडत असते. जेव्हा क्लस्टर डोकेदुखाच्या वेदना होतात तेव्हा अस्वस्थता जाणवते, डोळ्यातून अश्रू येतात आणि नाक बंद होते.
सायनस
सायनसमुळे होणारी डोकेदुखी ही डोळ्यांच्या आजूबाजूला होते. यामुळे नाक बंद होते. सहसा या वेदनांचे कारण जीवाणू किंवा ऍलर्जी असू शकते. म्हणून, जेव्हा जेव्हा तुम्हाला डोकेदुखी जाणवते तेव्हा वैद्यकीय सल्ला घ्या जेणेकरून त्यावर योग्य उपचार करता येतील.
तणाव
तणावामुळे डोकेदुखी होते, तेव्हा डोक्याच्या दोन्ही बाजूला वेदना होतात. सहसा या वेदना 7 दिवस ते 30 दिवस असतात. या प्रकारच्या वेदना डोक्याच्या दोन्ही बाजूंना हळूहळू वाढतात.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.