Stomach Care: पोटात जळजळ होत असेल तर 'या' पदार्थांचे करा सेवन

जर तुम्हाला पोटात जळजळ होत असेल तर लगंच या पेयांचे सेवन करा.
Stomach Care
Stomach CareDainik Gomantak
Published on
Updated on

Stomach Care: आजकालची धावपळीची लाइफस्टाइल आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे पोटाशी संबंधित अनेक समस्या उद्भवतात. यापैकी एक समस्या म्हणजे पोटात जळजळ होणे. ही समस्या अनेक वेळा पाणी कमी पिल्याने उद्भवते. त्यामुळे मळमळ, सूज येणे, पचनक्रियेत अडथळा यासारख्या समस्या उद्भवू लागतात. यापासून बचाव करण्यासाठी शरीराला थंडावा देणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे गरजेचे असते.

केळी

केळी हा एक अतिशय फायदेशीर फळ आहे. जे केवळ चवदारच नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. केळी खाल्ल्याने पोटातील जळजळ कमी होते आणि पचनसंस्था निरोगी राहते. यामध्ये पोटॅशियम आणि फायबरचे प्रमाण जास्त असते. जे पोटातील सूज कमी करण्यास मदत करते. याशिवाय कच्च्या केळीचे सेवन केल्याने या शारीरिक समस्यांपासून आराम मिळतो.

ताक

पोटातील जळजळ कमी होण्यास तुम्ही ताक पिऊ शकता. शरीराला थंडावा देण्याबरोबरच ते चयापचय वाढवते आणि पोटात जमा झालेली चरबी वितळण्यास मदत करते. रोज एक ग्लास ताक खाल्ल्याने डिहायड्रेशन आणि पोटातील जळजळ कमी करण्यास मदत करते. हे पेय प्रोबायोटिक्स, प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजांचा समृद्ध स्त्रोत आहे, जे आपल्या शरीराला ऊर्जा देखील प्रदान करते.

काकडी

पोटामध्ये होणारी जळजळ कमी करण्यासाठीही काकडी हा उत्तम पर्याय आहे. याच्या सेवनाने पोट थंड राहते आणि बद्धकोष्ठता आणि पचनाशी संबंधित समस्या दूर होतात. त्यात पाण्याचे प्रमाण जास्त असते. काकडीचे सेवन केल्याने इतर आरोग्यदायी फायदे देखील मिळतात.

नारळ पाणी

नारळ पाणी हे एक नैसर्गिक पेय आहे. जे शरीराला थंड ठेवण्यासाठी उपयुक्त आहे. यामध्ये पोटॅशियम, मॅंगनीज आणि अमीनो ऍसिडसह खनिजे आणि इलेक्ट्रोलाइट्समध्ये समृद्ध आहे. जे शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण करते. त्यात कॅलरी कमी आणि पोषक तत्वे भरपूर असतात. त्यामुळे पोटातील जळजळ आणि वजन कमी करण्यास मदत करते.

दही

दही हे नैसर्गिक पद्धतीने तयार केले जाते. त्यामुळे दही खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. यात भरपूर प्रोबायोटिक्स असते. जे पोटासाठी फायदेशीर असते. दही खाल्ल्याने पोटात जळजळ होत नाही. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दह्यापासूनही हे स्वादिष्ट पदार्थ बनवू शकता आणि त्याचा आहारात समावेश करू शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com