Stomach Cancer: पोटाच्या 'या' समस्यांकडे करू नका दुर्लक्ष, असू शकतात कॅन्सरचे लक्षण

Stomach Cancer Symptoms: तुमच्या पोटात देखील या समस्या जाणवत असेल तर तुम्हाला पोटाचा कॅन्सर होऊ शकतो.
Stomach Cancer Symptoms
Stomach Cancer SymptomsDainik Gomantak
Published on
Updated on

Stomach Cancer Symptoms: पोटाचा कॅन्सर होतो तेव्हा कॅन्सरच्या पेशी पोटाच्या आत वाढू लागतात. यासाच गॅस्ट्रिक कॅन्सर देखील म्हणतात. या आजाराचे सुरूवातील लक्षण लवकर समजत नाही. यामुळे हा आजार शेवटच्या टप्प्यात आल्यावर लक्षात येतो.

पोटाचा कॅन्सर वाढण्यासाठी अनेक वर्षे लागतात. सुरूवातीला कॅन्सरचे लक्षण हे घातक होत नाही. हळूहळू त्याचे लक्षण दिसू लागतात.

यामुळे पोटाचे वेळीच लक्षण ओळखूण उपचार करणे गरजेचे असते. जाणून घेऊया सुरूवातीच्या काळात पोटाच्या कॅन्सरची लक्षण कोणती असून शकतात.

  • पोटाच्या कॅन्सरचे लक्षण

पोटाचा कन्सर असलेल्या लोकांना सुरूवातीच्या टप्प्यात उलट्या आणि मळमळ होतात. जर तुम्हाला असा ६ास होत असेल आरोग्य तज्ञांशी लगेच संपर्क साधावा.

  • छातीत जळजळ होणे

तुमच्या छातीत जळजळ होत असेल किंवा दुखत असेल तर पोटाच्या कॅन्सरचे लक्षण असू शकते. यामुळे या समस्येकडे दुर्लक्ष करू नका.

  • कमी खाल्यावर देखील पोट भरल्यासारखे वाटणे

पोटाचा कॅन्सर असल्यास कमी खाल्यावर देखील पोट भरल्यासारखे वाटते. तुम्हालाही असे जाणवत असेल तर तुम्ही एकदा तपासणी करू शकता. यामुळे मनात येणारी शंका दूर होईल.

Stomach Cancer Symptoms
Vastu Tips: घरामध्ये कोणत्या दिशेला गाय अन् वासरूचा फोटो लावावा, वाचा वास्तुशास्त्र काय सांगतं
  • पोटाचे इन्फेक्शन

पोटामध्ये इन्फेक्शन किंवा कॅन्सरची समस्या असल्यास तुम्हाला ताप आल्यासारखे वाटू लागते.

  • पोटदुखी

पोटाच्या कॅन्सर असलेल्या लोकांना पोटदुखीला सामोरे जावे लागते.

  • मलमार्गातून रक्तस्त्राव

मलमार्गातून रक्तस्त्राव होत असेल तर हे देखील पोटाच्या कर्करोगाचे कारण असू शकते.अशा वेळी आरोग्य तज्ञांसी लगेच संपर्क साधावा.

  • डायरिया किंवा बद्धकोष्ठता

डायरिया किंवा बद्धकोष्ठतेची समस्या जास्त दिवसांपासून असल्यास हे पोटाच्या कर्करोगाचे कारण असू शकते. वरिल लक्षण आढल्यास तज्ञांशी संपर्क साधून उपचार सुरू करावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com