Superfood For Sharp Brain : कंप्युटर से तेज दिमाग! स्मरणशक्ती वाढवण्यासाठी 'हे' सुपर फुड्स फायदेशीर

शार्प स्मरणशक्ती हवी असेल तर आहारात या पदार्थांचे सेवन करावे.
Superfood For Brain
Superfood For Brain Dainik Gomatak

अनेक लोक स्मरणशक्ती शार्प करण्यासाठी विविध उपाय करतात. पण पाहिजे तस रिझल्ट मिळत नाही. जर तुम्हालाही स्मरणशक्ती शार्प करायची असेल तर आहारात पुढिल पदार्थांचा समावेश करावा.

egg
eggDainik Gomantak
  • अंडी

अंडी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. अंड्यामध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन बी 12 आणि कोलीन सारखे पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात. जे मेंदूच्या विकासासाठी आणि कार्यासाठी खूप फायदेशीर असतात. अंड्यांमध्ये आढळणारे कोलिन हे न्यूरोट्रांसमीटर म्हणून कार्य करते. मेंदूच्या पेशींच्या विकासासाठी प्रथिने आवश्यक असतात. अंडी ऑमलेट,उकळून खाऊ शकता.

व्हिटॅमिन बी 12 स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढवण्याचे कार्य करते. त्यामुळे अंडी नियमित खावी. पण अंडी जास्त प्रमाणात खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढू शकते.यामुळे प्रमाणात सेवन करावे.

Walnuts Benefits
Walnuts BenefitsDainik Gomantak
  • अक्रोड

अक्रोडमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड, व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट्स सारखे घटक असतात. हे घटक मेंदूच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. अक्रोड खाल्ल्याने एकाग्रता वाढते.पण ते नियमित आणि मर्यादित प्रमाणात खावे. अक्रोड जास्त प्रमाणात खाल्ल्याने वजन वाढू शकते.

Turmeric
Turmeric Dainik Gomantak
  • हळद

हळद स्वयंपाकघरात वापरली जाणारी औषधीयुक्त पदार्थ आहे. यामध्ये अँटीऑक्सिडंट असल्यामुळे मेंदुच्या पेशी सुरळित कार्य करतात. रक्त प्रवाह सुरळित करून ऑक्सिजन पुरवठा वाढवून मेंदुला ऊर्जा देतो.

Fish
FishDainik Gomantak
  • मासे

माश्यांमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड मुबलक प्रमाणात असते. यामुळे स्मरणशक्ती शार्प होण्यास मदत मिळते. हे मेंदूच्या पेशींचा विकास आणि कार्यक्षमता सुधारते. व्हिटॅमिन बी 12, आयोडीन आणि झिंक सारखे पोषक घटक देखील माशांमध्ये आढळतात. जे मेंदूच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहेत. माशांमध्ये प्रथिने आणि अमीनो ऍसिड मुबलक प्रमाणात असतात. यामुळे मेंदू सुरळित कार्य करू शकते. मासे खाल्ल्याने स्मरणशक्ती आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमता सुधारते. त्यामुळे आठवड्यातून 2-3 वेळा मासे खाणे मेंदूच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com