Mobile Side Effect: दिवसभरात फोनचा वापर कधी अन् किती करावा?

Mobile Side Effect: अनेक लोक संपुर्ण दिवस भर मोबाइल पाहण्यात घालवतात, पण तुम्हाला माहिती आहे का फोन कोणत्या वेळी वापरणे सर्वात धोकादायक आहे.
Mobile
MobileDainik Gomantak
Published on
Updated on

Side Effects Of Using Mobile: आजच्या आधुनिक युगात मोबाइलचा वापर खुप वाढला आहे. अनेक लोक झोपण्यापूर्वी फोन वापरतात. हे आरोग्यासाठी चांगले नाही. जर तुम्ही झोपण्यापूर्वी तासंतास तुमचा फोन पाहत असाल तर ही सवय लगेच बदला.

युरोपियन स्पेस एजन्सीमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार रात्री मोबाइल किंवा इतर कोणतेही इलेक्ट्रॉनिक गॅझेट वापरल्याने 'मेलाटोनिन' या स्लीप हार्मोनच्या निर्मितीमध्ये व्यत्यय येतो.

त्यामुळे लोकांना गाढ झोप लागत नाही. एवढेच नाही तर सकाळी उशिरा उठूनही त्यांना फ्रेश वाटत नाही. 

  • संशोधनात काय समोर आले?

संशोधनात असे दिसून आले आहे की फोनचा निळा प्रकाश झोपण्यापूर्वी मेलाटोनिन हार्मोन्सवर परिणाम करू शकतो. ज्यामुळे निद्रानाशाची समस्या निर्माण होऊ शकते.

त्यामुळे झोपण्याच्या किमान 30-60 मिनिटे आधी फोन वापरणे बंद करावा. चांगली आणि शांत झोपेसाठी फोनचा वापर मर्यादित करावा.

  • निळा प्रकाश म्हणजे काय?

हे संशोधन स्पेस स्टेशनमध्ये करण्यात आले आहे. या अहवालात असे सांगण्यात आले आहे की स्मार्टफोनच्या स्क्रीनमधून जो निळा प्रकाश येतो, तो झोपण्यापूर्वी तुमच्या सर्केडियन रिदमवर परिणाम करू शकतो. ज्यामुळे तुमच्या झोपेवर विपरित परिणाम होऊ शकतो.

तसेच अहवालात असे म्हटले आहे की, झोपण्यापूर्वी फोनचा वापर कमी करा किंवा निळा प्रकाश कमी करणारे अॅप्स वापरावे जेणेकरून तुम्हाला चांगली झोप लागेल. 

Mobile
Teacher's Day 2023: 'या' 4 पद्धतीने शिक्षक दिन बनवा स्पेशल
  • अहवालात काय सांगितले आहे?

या संशोधनातून असेही समोर आले आहे की, पृथ्वीवरील हवामान बदलाचा झोपेवरही नकारात्मक परिणाम होत आहे.

ESA (युरोपियन स्पेस एजन्सी) मते अंतराळातील झोपेचे संशोधन पृथ्वीवरील झोपेशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी उपयुक्त ठरेल. 

संशोधनासाठी एक विशेष उपकरण तयार केले गेले आहे. जे व्यक्तींच्या झोपेच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवण्यासाठी वापरले जात आहे. जे त्यांच्या रात्रभर मेंदूच्या क्रियांचा मागोवा घेऊ शकते. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com