Smoking Side Effects | Black Lips Remedies
Smoking Side Effects | Black Lips RemediesDainik Gomantak

Health Tips: सिगारेट ओढण्यासोबत तुमच्या 'या' सवयी तुम्हाला महाग पडू शकतात...

सुंदर आणि आकर्षक ओठ आपल्यापैकी प्रत्येकाला पाहिजे असतात. पण काहीवेळा काही सवयींमुळे ओठ काळे तर होतातच पण खूप कोरडेही दिसतात.
Published on

Health Tips: सुंदर आणि आकर्षक ओठ आपल्यापैकी प्रत्येकाला पाहिजे असतात. पण काहीवेळा काही सवयींमुळे ओठ काळे तर होतातच पण खूप कोरडेही दिसतात. या काळ्या ओठांमुळे अनेकवेळा लोकांना खूप पेच सहन करावा लागतो.

Smoking Side Effects | Black Lips Remedies
Rashi Bhavishya 08 December: कसा असेल तुमचा आजचा दिवस? वाचा पूर्ण राशीभविष्य

अशा परिस्थितीत जर तुमचे ओठ देखील काळे झाले असतील आणि तुम्हाला त्यापासून मुक्ती मिळवायची असेल तर तुम्हाला तुमच्या काही सवयी सोडाव्या लागतील. आम्ही तुम्हाला अशाच काही सवयींबद्दल सांगणार आहोत, ज्या सोडल्याने तुमचे ओठ सुंदर आणि आकर्षक होऊ शकतात.

मृत त्वचा- आपल्या ओठांवर मृत त्वचेच्या पेशींचा एक थर साचतो, ज्याला काढून टाकणे खूप महत्वाचे आहे. मृत त्वचेमुळे ओठांवर सुरकुत्या दिसू लागतात. त्यामुळे ओठांची त्वचा खराब होऊ लागते. अशा परिस्थितीत, दररोज ओठांना मालिश करणे आणि मृत त्वचेच्या पेशी काढून टाकणे महत्वाचे आहे.

लिपस्टिक- लिपस्टिकच्या वापरानेही ओठ काळे होतात. लिपस्टिकमध्ये केमिकल्सचा वापर केला जातो ज्यामुळे ओठ काळे होऊ लागतात, विशेषत: निकृष्ट दर्जाच्या लिपस्टिकच्या वापरामुळे या समस्येला सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत केवळ चांगल्या दर्जाची लिपस्टिक वापरणे महत्त्वाचे आहे.

धूम्रपान- धुम्रपानामुळेही ओठ काळे होतात. त्यामुळे तुम्हीही धूम्रपान करत असाल तर ही वाईट सवय आजच सोडा. असे केल्याने तुम्ही तुमचे ओठ काळे होण्यापासून वाचवू शकता.

कमी पाणी पिणे- शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे ओठांचा रंगही बदलतो. अशा परिस्थितीत तुम्ही भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे. हिवाळ्यात याची विशेष काळजी घ्या आणि किमान 8 ग्लास पाणी प्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com