Smartphone: 699 रुपयांमध्ये 5G स्मार्टफोन खरेदी करण्याची बेस्ट संधी

Smartphone: ही बंपर ऑफर 14 नोव्हेंबरपर्यंत असणार आहे.
Smartphone
SmartphoneDainik Gomantak

Smartphone: स्मार्टफोन हा आपल्या सर्वांच्या खूप जवळचा विषय आहे. बाजारात नवीन कोणता फोन आला की, तो आपल्याला हवा असतो. अशा मोबाईल लव्हर्ससाठी सध्या फ्लिपकार्टवर धमाकेदार मोबाईल्स बोनान्झा सेल सुरू आहे. 14 नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या धमाकेदार सेलमध्ये तुम्ही बेस्ट ऑफर्समध्ये टॉप कंपन्यांचे स्मार्टफोन खरेदी करू शकता. तसेच, जर तुम्ही 15 हजार रुपयांच्या आत एक मस्त स्मार्टफोन घेण्याच्या विचारात असाल तर, रियलमी नाईन आय(Realme 9i 5G) हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो.

4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या या फोनची एमआरपी किंमत 17,999 रुपये आहे. पण सेलमध्ये तुम्ही 4,000 रुपयांच्या डिस्काउंटवर 13,999 रुपयांना हा फोन (Phone) खरेदी करू शकता. हा फोन खरेदी करण्यासाठी तुम्ही फ्लिपकार्डचे अ‍ॅक्सिस बॅंक कार्ड वापरले तर तुम्हाला 5% कॅशबॅक देखील मिळेल. एक्सचेंज ऑफरमध्ये तुम्हाला 13,300 रुपयांपर्यंत फायदा होऊ शकतो.

Smartphone
Tricks For Sharp Brain : मेंदू तीक्ष्ण करण्यासाठी 'या' सवयी ठरतात वरदान; घ्याल सर्वोत्तम निर्णय

दरम्यान, जुन्या फोनच्या बदल्यात पूर्ण एक्सचेंज मिळाल्यावर तुमचा हा फोन 13,999-13,300 म्हणजेच 699 रुपयांचा असू शकतो. पण या ऑफरचा फायदा होण्यासाठी जुन्या फोनचा एक्सचेंज बोनस त्याच्या स्थितीवर अवलंबून असेल. या फोनच्या फिचर्सबद्दल अधिक सांगायचे झाल्यास, कंपनी 2408×1080 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.6-इंचाचा फुल एचडी + डिस्प्ले देत आहे. हा डिस्प्ले 90Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो.

Phone
PhoneSmartphone:

तसेच, फोनमध्ये आढळणारा हा डिस्प्ले 400 nits च्या पीक ब्राइटनेस लेव्हलसह येतो. रियलमीचा हा फोन 6 जीबी रॅम आणि 128 जीबीपर्यंत इंटरनल स्टोरेज या ऑप्शनमध्येही उपलब्ध आहे. प्रोसेसर म्हणून कंपनी त्यात MediaTek Dimension 810 5G चिपसेट देत आहे. फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस जबरदस्त एलईडी फ्लॅशसह तीन कॅमेरे देण्यात आले आहेत. यामध्ये एक पोर्ट्रेट, 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आणि एक मॅक्रो कॅमेरा (Camera) पण आहे. त्याचबरोबर सेल्फीसाठी फोनच्या फ्रंटमध्ये 8-मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

चांगल्या कनेक्टिव्हिटीसाठी फोनसध्ये वाय-फाय, ब्लूटूथ 5.2, जीपीएस, मायक्रो एसडी कार्ड स्लॉट आणि 3.5 मिमी हेडफोन असे छान पर्याय उपलब्ध आहेत. या फोनमध्ये 5000mAhची बॅटरी येईल. ही बॅटरी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com