Small Child Brain Sharp: 'या' 5 गोष्टी मुलांना शिकवल्यास ब्रेन होईल शार्प

मुलांचा ब्रेन शार्प होण्यासाठी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे हे जाणून घेऊया.
Small Child Brain Sharp
Small Child Brain SharpDainik Gomantak
Published on
Updated on

Small Child Brain Sharp: लहान मुलांच्या शारिरिक आरोग्यासह मानसिक आरोग्य देखील चांगले ठेवणे गरजेचे आहे. यासाठी त्यांना चांगले आणि सकारात्मक वातावरण देणे गरजेचे आहे. यासोबतच अशा काही गोष्टी आहेत ज्यामुळे मुलांचे ब्रेन अधिक शार्प होण्यास मदत मिळते.

म्युझिक शिकवा


मुलांसाठी संगीत शिकणे खूप फायदेशीर आहे. त्यामुळे त्यांच्या मेंदूचा विकास होण्यास मदत मिळते. तसेच त्यांच्यामध्ये अनेक चांगल्या सवयी रुजवल्या जातात. मुलं एखादे वाद्य वाजवतात तेव्हा त्यांचे संपूर्ण लक्ष त्यावर केंद्रित होते. ते एका गोष्टीवर दीर्घकाळ लक्ष केंद्रित करू शकतात. यामुळे त्यांची स्मरणशक्ती शार्प होते. 

डान्स शिकवावे


जेव्हा मुलं डान्स करतात तेव्हा त्यांना हालचाली समजून घ्याव्या लागतात आणि संगीताच्या तालावर त्यांचे शरीराचे अवयव समन्वयित करावे लागतात. यामुळे त्यांचे मन आणि शरीर दोन्ही सक्रिय राहतात. त्यामुळे त्यांचे ब्रेन देखील सक्रिय राहते.

स्पोर्टस खेळावे


मुलांना खेळ शिकवणं खूप महत्वाचे आहे. कारण ते त्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी फायदेशीर आहे. खेळामुळे मुलांचे मन आणि मेंदु सक्रिय होते. खेळ खेळताना मुलांनी खेळाचे नियम समजून घेणे, रणनीती बनवणे आणि प्रतिस्पर्ध्याच्या चाली समजून घेणे आवश्यक आहे. या सगळ्यामुळे त्यांचे मन सक्रिय राहते. ते निर्णय लवकर घ्यायला शिकतात. तसेच, शारीरिक व्यायामामुळे त्यांच्या मेंदूतील रक्ताभिसरण वाढते. ज्यामुळे त्यांची एकाग्रता, समस्या सोडवण्याची क्षमता आणि स्मरणशक्ती सुधारते. 

ड्रॉइंग काढायला शिकवावे


मुलांसाठी ड्रॉइंग काढणे आणि रंग भरणे यासारख्या अॅक्टिव्हिटी करणे खूप महत्वाचे आहे. हा एक मजेदार उपक्रम तर आहेच पण मुलांच्या ब्रेनचा विकास होण्यासही मदत होते. मुले एखादे ड्रॉइंग काढतात किंवा रंगवतात तेव्हा त्यांचे संपूर्ण लक्ष त्या कामावर असते. ते एकाग्र होऊन त्या कामात बराच वेळ मग्न असतात. यामुळे त्यांची लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढते. 

गार्डनिंग करावी


बागकामातून मुले दैनंदिन काळजी, संयम आणि कठोर परिश्रम शिकतात जे भविष्यात त्यांच्यासाठी खूप फायदेशीर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com