Hair care Tips: ओल्या केसांमध्ये झोपल्याने पडू शकते 'टक्कल'
अनेक लोकांना वेळीची कमतरता असल्याने सकाळी केस न धुता (Washed) रात्री केस धुतात. पण तुम्हाला माहिती आहे का असे केल्याने तुमच्या केसांचे नुकसान (Hair loss) होऊ शकते. रात्री केस धुतल्याने केसांच्या (Hair) अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. ओल्या केसांमध्ये झोपल्याने केस गळणे (Hair loss), केस तुटणे (break) तसेच टक्कल पडणे अशा समस्या (Hair Problem) निर्माण होऊ शकतात. यामुळे जाणून घेऊया ओल्या केसांमध्ये (Wet hair) झोपण्याचे नुकसान.
* रात्री ओल्या केसांमध्ये झोपण्याचे नुकसान
* टक्कल पडणे
ओल्या केसांमध्ये झोपल्याने केसांची मुळे कमकुवत होतात. यामुळे केस तुटण्याची शक्यता असते. तसेच केसांच्या मुळात एक प्रकारचा बुरशीजन्य संसर्ग होऊ शकतो,ज्याला दाद म्हणतात. हा संसर्ग नेहमी गरम आणि ओलसर परिस्थितिमुळे निर्माण होतो. यामुळेच केसांच्या संपर्कात येणाऱ्या वस्तु स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे.
* कोंड्याची समस्या निर्माण होते
रात्री केस धुतल्याने केस ओलेच राहण्याची शक्यता असते. यामुळे केसांमध्ये कोंडा वधू शकतो. ओल्या केसांमध्ये झोपल्याने केसांतील नैसर्गिक टेलकटपणा कमी होऊन केस कोरडे पडतात.
* बॅक्टेरियामध्ये वाढ
ओल्या केसांमध्ये झोपल्याने तुमच्या उशीवर बॅक्टेरिया वाढू शकते. कारण ओल्या केसांतील ओलावा उशीमध्ये जातो. यामुळे ओल्या केसांमध्ये झोपने टाळावे.
* थंडी वाजणे
जर रात्री तुम्ही केस धुतले आणि अशा ओल्या केसांनी एसी रूममध्ये किंवा पंख्या खाली झोपत असाल तर तुम्हाला थंडी वाजून ताप येवू शकते. यामुळे ओल्या केसांमध्ये झोपणे टाळावे.
* केस तुटणे
ओले केस खूप कमकुवत असतात. झोपतांना आपण अनेक वेळा बाजू बदलतो. यामुळे केस तुटण्याची शक्यता अधिक असते. यामुळे ओल्या केसांमध्ये झोपणे टाळावे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.