Neem For Skin Disease In Monsoon: पावसाळ्यात होणाऱ्या त्वचेच्या आजारांवर कडुनिंब ठरेल रामबाण उपाय

Skin Disease In Monsoon: कडुलिंबाचा उपयोग त्वचेच्या आजारांमध्ये नेहमी केला जातो.
Neem For Skin Disease
Neem For Skin DiseaseDainik Gomantak
Published on
Updated on

Skin Disease In Monsoon: पावसाळ्यात त्वचेचे आजार खूप त्रासदायक होतात, असे म्हणतात. पावसाळ्यातील ओलाव्यामुळे त्वचेचे आजार सहज पसरतात किंवा होऊ शकतात.

याबरोबरच आपण पावसात भिजल्यानंतर शरीर नीट पुसुन कोरडे केले नाही तर त्वचेचे आजार सहज बळावल्याचे दिसते. याबरोबरच जर सतत पाय चिखलात असतील तरीदेखील त्वचेचे आजार झाल्याचे दिसून येते.

कडुलिंबाचा असा करा उपयोग

कडुलिंबात भरपूर औषधी गुणधर्म आहेत. या झाडाच्या मुळापासून पाने, फुले, बिया, साल, लाकूड हे सर्व गुणधर्म आहेत ज्याचा वापर करून रोग टाळता येतात. बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा आणि बुरशीविरोधी गुणधर्म असलेल्या कडुलिंबाचा उपयोग त्वचेच्या आजारांमध्ये नेहमी केला जातो.

कडूनिंबाची साल आणि कडुलिंबाच्या बिया 0-10 ग्रॅम कडुलिंबाच्या पानांसह बारीक करून त्याची पेस्ट बनवा. जिथे तुम्हाला त्वचेला खाज असेल तिथे ही पेस्ट लावा. यामुळे तुम्हाला त्वरित आराम मिळेल. ही पेस्ट तुम्ही पिंपल्सवरही लावू शकता. खाज आणि फोडांवर कडुनिंबाचा वापर केल्याने खूप फायदा होतो.

Neem For Skin Disease
Relief from Knee Pain: 'हे' तेल देईल गुडघे दुखीपासून सुटका

यासाठी जुन्या कडुलिंबाच्या झाडाची कोरडी साल काढून बारीक पावडर बनवावी आणि नंतर 3 ग्रॅम पावडर एका ग्लास पाण्यात रात्रभर भिजवावी. त्यानंतर सकाळी त्यात मध मिसळा. या पाण्याचा वापर केल्यास त्वचेच्या आजारात आराम मिळतो.

एक्जिमाच्या समस्येतही कडुलिंबाची पाने रसात भिजवून त्यावर मलमपट्टी लावल्याने खूप फायदा होतो. जखमा बरे करण्यासाठी कडुनिंबाची 10-14 पाने घ्या आणि नंतर त्याची पेस्ट बनवण्यासाठी चांगली बारीक करा. 2-3 वेळा आराम मिळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com