Skin Care Tips: निरोगी आरोग्या आणि त्वचेसाठी पोषक आहार घेणं आवश्यक असतं. पण तुम्ही जर तेलकट, जंक फूडचे सेवन करत असाल तर याचा पिरणाम आरोग्यासह त्वचेवर देखील होतो. असे काही पदार्थ आहेत ज्यामुळे त्वचेवर वेळेआधीच वृद्धत्व जाणवते. चला तर मग जाणून घेऊया असे कोणते पदार्थ आहेत ज्यांचे सेवन टाळले पाहिजे.
तेलकट पदार्थ
तेलकट पदार्थ खाल्याने त्वचेवर पिंपल, वजन वाढणे यासारख्या समस्या वाढतात. जे लोक तेलकट पदार्थांचे अतिसेवन करतात त्यांनी असे पदार्थ खाणे आजच बंद करावे.
साखर
साखरेचे अतिसेवन अनेक आजार निर्माण करतात. यामुळे मधुमेह, लठ्ठपणा यासारख्या समस्या वाढतात. तसेच त्वचेवर देखील वाईट परिणाम दिसून येतात.
चीज
अनेक लोकांना चीज खायला खुप आवडते.पण तुम्हाला माहिती आहे का की या चीजमध्ये सोडियम असते. यामुळे जळजळ आणि हृदय, पोटा संबंधित विकार वाढू शकतात. तसेच त्वचेवर वृद्धत्वाची लक्षणे दिसतात. यामुळे जे लोक चीज खुप खातात. त्यांना वेळीच या पदार्थांचे सेवन टाळावे.
शिपपेय
ज्या पदार्थांमध्ये साखरेचे प्रमाण अधिक असते, त्यामुळे वजन वाढू शकते. तसेच चंहऱ्यावर वृद्धत्वाचे लक्षण दिसतात. यामुळे शितपियांचे अतिसेवन टाळावे.
चमकदार त्वचेसाठी काय करावे
तुम्हाला जर निरोगी आणि चमकदार त्वचा ठेवायची असेल तर पोषक घटकांनी भरलेल्या पदार्थांचे सेवन करावे.
नियमितपणे योगा करावा.
दिवसभरात ५ ते ६ लीटर पाणी प्यावे.
चमकदार त्वचेसाठी फळांचे सेवन करावे.
मार्केटमध्ये मिळणाऱ्या केमिकलयुक्त ब्युटी प्रोडक्टचा वापर कमी करावा.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.