Honey: मध त्वचेसाठी कसा उपयोगी पडतो हे तुम्हाला माहित आहे का ?

Honey: मधामध्ये ॲंटीबॅक्टेरिअल गुणधर्म असतात. त्याचबरोबर मधाचा नैसर्गिक मॉश्चेरायझर म्हणून वापर करतात.
Honey
HoneyDainik Gomantak

Honey: मध बहुगुणधर्मीय असल्याचे आपल्याला माहित असते.मधाचा औषधातसुद्धा वापर करतात. मधाचे आपल्या त्वचेसाठीचे असणारे फायदे तुम्हाला माहीत आहेत का ? चला तर मग आज जाणून घेऊयात मधाचा त्वचेसाठी कसा वापर केला जाऊ शकतो.

1. मधामध्ये ॲंटीबॅक्टेरिअल गुणधर्म असतात. त्याचबरोबर मधाचा नैसर्गिक मॉश्चेरायझर म्हणून वापर करतात.

2. त्वचेवरील तेलकटपणा दूर करण्यास मध उपयोगी पडतो.

3. मधाचा त्वचेसाठी वापर केल्याने चेहऱ्यावर चमक येते.

4. मध ॲमिनो ॲसिड , व्हीटॅमीन, प्रोटीन , मिनरल्स या सर्व पोषक तत्वांनीयुक्त असतो. मधामध्ये असणारे हे गुणधर्म त्वचेचा कडकपणा घालवून त्वचा मऊ बनवण्यात मदत करतात.

5. त्वचेवरील काळे डाग घालवण्यास मधाचा वापर फायदेशीर ठरतो.

Honey
Vastu Shashtra : बेडरूमची सजावट 'अशी' करा आणि नात्यामधील तणावाचे प्रसंग टाळा..

5. जर तुमची त्वचा खरबरीत झाली असेल तर हळद ,कॉफी( Coffee) आणि मधाचे मिश्रण तुमची खरबरीत त्वचा पूर्ववत होण्यास मदत करेल.

7. जर तुम्हाला बॅक्टेरिअल इनफेक्शन झाले असेल , त्याचबरोबर तुमच्या त्वचेची जळजळ होत असेल तर मध आणि हळद( Turmeric) एकत्र केलेला लेप तुमच्या त्वचेसाठी उपयुक्त ठरेल.

8. त्वचेवर असलेल्या काळ्या डाग घालवायचे असतील तर मध आणि ऑलिव्ह ऑईल यांचे एकसारखे प्रमाण घेऊन ते 20 मिनिटांसाठी त्वचेवर लावल्यास त्वचा डागविरहित होण्यास मदत होईल.

9. ज्यांची त्वचा तेलकट आहे. अशा लोकांनी मध, अंड्याचा पांढरा भाग आणि लिंबुचा रस यांचे मिश्रण 20 मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावल्यास तेलकटपणा कमी होण्यास मदत होईल.

अशा प्रकारे मधाचा त्वचा निरोगी ठेवण्यासाठी, त्वचेच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी उपयोग केला जाऊ शकतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com