Holi 2024: लेट्स प्ले होळी! रंगांची उधळण करतांना फोन, स्मार्टवॉच मौल्यवान वस्तूंची अशी 'घ्या' काळजी

Holi 2024: रंग खेळताना फोन, स्मार्टवॉच यासरख्या मौल्यवान वस्तूंची काळजी घेण्यासाठी पुढील हॅक्स फॉलो करू शकता.
Holi 2024:
Holi 2024:Dainik Gomantak

यंदा 25 मार्चला होळी असली तरी त्याचा उत्साह लोकांमध्ये आधीच दिसून येत आहे. बाजारपेठा रंगीबेरंगी पिचकारी, रंग, सजावटीच्या साहित्याने सजल्या आहेत. लोकांनी होळी पार्टीची सर्व तयारी केली आहे. लोकांनी होळीसाठी जागा आणि कपडेही निवडले आहेत. पण रंग खेळताना मौल्यवाण गोष्टींची काळजी कशी घ्याल याचा विचार केला आहे का?

अनेकदा होळी खेळताना लोक आपला फोन, स्मार्टवॉच, पैसे या गोष्टींची काळजी घेत नाहीत. यासारख्या वस्तू खराब होऊ नये म्हणून पुढील गोष्टींची काळजी घेऊ शकता.

  • वॉटरप्रूफ झिप लॉक बॅग

रंग खेळतांना मोबाइल, वॉच यासारख्या वस्तू जर या झिप लॉक बॅगमध्ये ठेवली तर वस्तू खराब होणार नाही. तसेच झिप लॉक बॅगच्या वरून टच स्क्रीन वापरता येते. जर तुम्ही फोनवर बोलत असाल आणि कोणी तुमच्यावर पाणी टाकले तर फोन खराब होणार नाही.

  • कपड्यांची पिशवी

तुम्ही कपड्यांच्या पिशवीत तुमच्या मौल्यवान वस्तू ठेऊ शकता. कापडी पिशवी असेल तर पॉलिथिनचा वापर करू शकता. संपूर्ण बॅग पॉलिथिनने झाकून ठेवा. जर तुमच्याकडे पॉलिथिन नसेल तर सर्व वस्तूंच्या खाली तुमच्या महत्त्वाच्या वस्तू बॅगेत ठेवा. यामुळे पाणी पडल्यास ते वरील वस्तूंवर पडेल आणि तुमच्या महत्त्वाच्या वस्तूं खराब होणार नाही.

  • टेपचा वापर

जर तुम्हाला होळीच्या दिवशी तुमचा फोन ओला होण्यापासून वाचवायचा असेल तर तुम्ही टेप लावू शकता. फोनच्या चारही बाजू जेथे कव्हर बंद होते, तसेच फोनचा जॅक टॅबसह झाकून ठेवा. यामुळे फोनमध्ये पाणी जाणार नाही आणि फोन खराब होणार नाही. यामुळे तुम्ही रंग खेळण्याचा मनसोक्त आनंद लूटू शकता.

  • पॉलिथिन वापरावी

जर तुमचे बजेट कमी असेल तर सर्वात चांगला आणि स्वस्त उपाय म्हणजे तुमच्या महत्त्वाच्या गोष्टी पॉलिथिनमध्ये ठेवा आणि गाठ बांधा. यासाठी तुम्हाला पैसे खर्च करण्याची किंवा जास्त विचार करण्याची गरज पडणार नाही.

  • लंच बॉक्स

जर तुम्ही ऑफिसला गेला असाल आणि अचानक तुम्ही मित्रांसोबत होळी खेळण्याचा प्लॅन केला असेल, तर तुम्ही तुमच्या महत्त्वाच्या गोष्टी तुमच्या जेवणाच्या डब्यात सुरक्षित ठेवू शकता. तसेच गाडीच्या डिकीमध्ये वस्तू ठेऊ शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com