Sabudana Paratha Recipe : दत्त जयंतीच्या उपवासाला ट्राय करा हा झटपट होणारा साबुदाणा पराठा

साबुदाणा पराठा बनवणे खूप सोपे आहे आणि तो थोड्याच वेळात तयार होतो.
Sabudana Paratha Recipe
Sabudana Paratha Recipe Dainik Gomantak

उद्या दत्त जयंती असून यावेळी बहुतेक लोकांचा उपवास असतो. भारतात उपवासासाठी प्रामुख्याने साबुदाणा खिचडी खाल्ली जाते. पण यात एक नवीन ट्विस्ट आणून आपण वेगळा पदार्थ ट्राय करू शकतो.

आज आपण साबुदाणा पराठा कसा बनवतात ते पाहणार आहोत. हा पराठा बनवणे खूप सोपे आहे आणि तो थोड्याच वेळात तयार होतो. तर तुम्हीही बनवा साबुदाणा पराठा आणि तुमच्या कुटुंबासोबत आस्वाद घ्या. (Sabudana Paratha Recipe in Marathi)

Sabudana Paratha Recipe
Swasthyam 2022 : मानसिक-शारीरिक आरोग्यासाठी ‘स्वास्थ्यम्’ का उपयुक्त? जाणून घ्या योगसाधनेचे फायदे

आवश्यक साहित्य

 • भिजवलेला साबुदाणा

 • उकडलेले बटाटे - 3

 • शेंगदाणा पावडर - 1/2 कप

 • आले - 1/2 टीस्पून, किसलेले

 • हिरवी मिरची - 1/2 टीस्पून, बारीक चिरून

 • काळी मिरी - 1/2 टीस्पून, ठेचून

 • मीठ - 3/4 टीस्पून

 • कोथिंबीर

 • तूप

साबुदाणा पराठा बनवण्याची कृती

 • एका भांड्यात 3 उकडलेले बटाटे किसून घ्या. नंतर त्यात भिजवलेला साबुदाणा, 1/2 कप शेंगदाण्याची पूड, 1/2 टीस्पून किसलेले आले, 1/2 टीस्पून बारीक चिरलेली हिरवी मिरची, 1/2 टीस्पून बारीक वाटलेली काळी मिरी, 3/4 टीस्पून रॉक मीठ आणि कोथिंबीर चिरून घाला आणि सर्व मिश्रण एकजीव करा.

 • सर्व मिक्स केल्यावर हातात थोडं तूप लावून मिश्रणाचा एक गोळा करून तो पॉलिथीनमध्ये ठेवून अलगद रोल करा.

 • आता तवा गरम करून त्यात थोडं तूप पसरवा. पराठा तव्यावर ठेवून 3-4 मिनिटे भाजून घ्या. दोन्ही बाजूंनी तूप लावून पराठा सोनेरी होईसेपर्यंत भाजून घ्या.

 • पराठा शिजल्यावर प्लेटमध्ये काढून घ्या आणि बाकीचे पराठे त्याच प्रकारे तयार करा. अशा प्रकारे साबुदाणा पराठा तयार होईल. साबुदाणा पराठा तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com