Nail Biting: नखे चावण्याची तुमची सवय बनू शकते आजारांचे कारण; याचे वाईट परिणाम एकदा वाचाच

घरात नखे चावल्याबद्दल आपल्याला फटकारले जाते. कारण ही एक वाईट सवय आहे
Nails Chewing  Disadvantages
Nails Chewing DisadvantagesDainik Gomantak
Published on
Updated on

Nail Biting: अनेकदा घरात नखे चावल्याबद्दल आपल्याला फटकारले जाते. कारण ही एक वाईट सवय आहे. पण तुम्हाला आपल्याला नखे ​​चावण्यास का मनाई करतात? वास्तविक, नखे चावण्याची सवय तुम्हाला गंभीर आजारी बनवू शकते. यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात.

नखे चावणे ही अशी सवय आहे, जी थांबवणे खूप कठीण आहे. एका संशोधनात असे सांगण्यात आले आहे की, जगातील 30 टक्के लोकांना नखे ​​चावण्याची सवय आहे. या सवयीमुळे होणारे नुकसान आणि यापासून सुटका कशी करावी हे जाणून घेऊया.

Nails Chewing  Disadvantages
Cold Water in Summer: उन्हाळ्यात तुम्हीही फ्रीजचे पाणी पिता? मग या 6 गोष्टी त्वरित जाणून घ्या, नाहीतर...

नखे चावणे का आहे धोकादायक

  • बॅक्टेरिया संसर्गाचा धोका

नखे चावल्यावर नखांमध्ये जमा झालेले बॅक्टेरिया तोंडातून शरीरात पोहोचतात आणि पॅरोनीचिया नावाच्या बॅक्टेरियाचा संसर्ग होण्याचा धोका असतो. हा संसर्ग हळूहळू शरीरभर पसरू लागतो. त्यामुळे अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होऊ लागतात. याचा आणखी एक तोटा असा आहे की या संसर्गामध्ये नखांमध्ये पू होऊ शकतो. यावर वेळीच उपचार न केल्यास ताप, अंगदुखी अशा समस्या उद्भवू शकतात. मधुमेहाच्या रुग्णांना याचा धोका अधिक असतो.

  • नैसर्गिक वाढ थांबू शकते

तुम्हाला नखे ​​वारंवार चावण्याची सवय असेल तर त्यांची नैसर्गिक वाढ थांबू शकते. नखे वारंवार चघळल्याने त्यांच्या वाढीच्या ऊतींचे नुकसान होऊ शकते. यामुळे नखे वाढणे थांबू शकते.

  • बुरशीजन्य संसर्ग होऊ शकतो

नखे चघळल्याने त्यामध्ये जमा झालेली बुरशी तोंडाद्वारे शरीराच्या इतर भागात पोहोचते आणि त्यामुळे बुरशीजन्य संसर्ग होऊ शकतो. जे तुमच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकतात.

  • दातांना इजा होऊ शकते

नखे चावल्याने दात कमकुवत होऊ शकतात. यामुळे हिरड्यांमध्ये रक्तस्त्राव किंवा दात दुखू शकतात. म्हणूनच नखे चावू नयेत.

नखे चावण्याची सवय थांबवण्यासाठी टिप्स

  • 1. जर तुम्हाला तुमची नखे चावण्याची वाईट सवय सोडायची असेल तर तुम्ही माउथ गार्डची मदत घेऊ शकता.

  • 2. तणाव दूर करण्याचा प्रयत्न करा. बरेच लोक खूप तणावाखाली असताना नखे ​​चघळतात.

  • 3. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तुमच्या नखांवर कडुलिंबाचा रस लावू शकता. यामुळे तोंडात नखे घातल्याने कडूपणा येईल आणि नखे चावू नयेत हे लक्षात येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com