Shikakai Hair Masks: कोंड्याची समस्या दूर करण्यासाठी शेकाकाईचे 'हे' 3 हेअर मास्क नक्की ट्राय करा

Shikakai Hair Masks: केसांची चमक आणि कोड्यांची समस्या दूर करण्यासाठी शेकाकाईचा वापर करू शकता.
Shikakai Hair Masks
Shikakai Hair MasksDainik Gomantak
Published on
Updated on

shikakai hair masks try at home for shine strong hair

केस चमकदार आणि घनदाट ठेवण्यासाठी योग्य काळजी घेणे गरजेचे असते. जर तुम्ही केसांचे प्रदूषणापासून सरंक्षण करू शकत नसाल तर केस खराब होतात. तसेच केसांची योग्य काळजी घेतली नाही तर केस गळण्याची समस्या वाढू लागते. ही समस्या कमी करण्यासाठी तुम्ही शिककाईचे विविध मास्कच्या मदतीने केस चमकदार आणि मजबूत ठेऊ शकता.

Hair Care Tips
Hair Care TipsDainik Gomantak

आवळा, रीठा, शिककाई हेअर मास्क

जर तुमच्या केसांमध्ये कोंड्याची समस्या असेल तर तुम्ही आवळा, रीठा आणि शिकाकाईपासून बनवलेला हेअर मास्क वापरू शकता. हा मास्क तयार करण्यासाठी एका भांड्यात 4 चमचे आवळा रस, 2 चमचे शिकाकाई पावडर आणि 2 चमचे रीठा पावडर मिक्स करावे. नंतर ते मिक्स करून त्याची पेस्ट बनवा आणि केसांना लावावे. अर्ध्या तासानंतर केस स्वच्छ पाण्याने धुवावे.

olive oil
olive oilDainik Gomantak

ऑलिव्ह ऑईल आणि शिककाई

केस गळण्याची समस्या असेल तर तुम्ही ऑलिव्ह ऑइल आणि शिकाकाइ मास्क वापरू शकता. हा हेअर मास्क वापरण्यासाठी एका भांड्यात 5 ते 6 चमचे ऑलिव्ह ऑइल आणि त्यात 4 चमचे शिकाकाई वापरावी. जर ते घट्ट झाले तर त्यात आणखी थोडे तेल मिक्स करावे. आंघोळीच्या अर्धा तास आधी केसांना लावा आणि नंतर सौम्य शॅम्पूने केस स्वच्छ धुवावे.

curd
curdDainik Gomantak

दही आणि शिकाकाई हेअर मास्क

केस ड्राय आणि कमकुवत झाले असतील तर शिकाकाईमध्ये दही मिक्स करून वापरू शकता. हा मास्क तयार करण्यासाठी एका भांड्यात 4 ते 5 चमचे दही घ्या आणि त्यात 4 चमचे शिककाई पावडर मिक्स करावी. नंतर ही पेस्ट केसांना लावावी. असे आठवड्यातून दोनदा केल्यावर केस निरोगी आणि चमकदार राहतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com