Shani Dev |
Shani Dev | Dainik Gomantak

Shaniwar Upay: शनिवारी 'हे' उपाय केल्यास शनिदेव उघडतील नशीबीचे दार

शनिवारी शनिदेवाची पूजा केल्यास अनेक संकटे दूर राहतात.
Published on

शनिवार हा दिवस शनिदेवाला समर्पित आहे. या दिवशी शनिदेवाची पूजा विधीनुसार केली जाते. यामुळे शनिदेव खूप प्रसन्न होतात. भक्तांचे सर्व संकट दूर करतात. ज्योतिष शास्त्रात शनिदेवाला कलियुगाचा न्यायाधीश म्हटले जाते.

तो लोकांना त्यांच्या कर्माप्रमाणे फळ देतो. त्यामुळे प्रत्येकाला शनिदेवाला प्रसन्न करायचे असते. शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी शनिवारी हे उपाय अवश्य करावेत. यामुळे तुमच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात.

  • शनिवारी पीपळाची 11 न कापलेली पाने घेऊन त्यांची हार घालावी. आता जवळच्या शनि मंदिरात जाऊन शनिदेवाला ही माळा अर्पण करा. पुष्पहार अर्पण करताना 'ओम श्री ह्रीं शाम शनैश्चराय नमः' या मंत्राचा जप करत रहा. त्यामुळे कोर्ट-कचेरीतील सर्व अडचणी दूर होतील.

  • शनिवारी पिंपळाच्या झाडाला सात वेळा प्रदक्षिणा घालताना कच्च्या कापसाचा धागा सात वेळा गुंडाळा. परिक्रमा करताना शनिदेवाचे (Shani Dev) ध्यान करत राहावे. असे केल्याने प्रगती होईल.

Shani Dev |
Health Tips: हृदयविकारावर साबुदाणा ठरु शकतो रामबाण उपाय
  • वैवाहिक जीवन सुखी करण्यासाठी शनिवारी थोडेसे काळे तीळ घेऊन पिंपळाच्या झाडाजवळ अर्पण करा. त्यानंतर पिंपळाच्या मुळाला पाणी अर्पण करावे.

  • शनिवारी एक काळा कोळसा घेऊन तो वाहत्या पाण्यात वाहू द्या. तसेच 'शं शनिश्चराय नमः' या मंत्राचा जप करावा. यामुळे तुम्हाला नोकरी (Job) मिळवण्यात यश मिळेल आणि तुमचे उत्पन्न वाढेल.

  • शनिवारी पुष्प नक्षत्रात एक ग्लास पाणी घ्या. त्यात थोडी साखर घाला. हे पाणी पिंपळाच्या झाडाच्या मुळास अर्पण करावे. तसेच 'ओम ह्रीं श्री शनैश्चराय नमः' या मंत्राचा जप करा. यामुळे घरात सुख-समृद्धी नांदेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com