दुचाकी शिकणे म्हणजे स्वावलंबनच..!

स्वावलंबनाकडे त्यांना घेऊन जाणारी, त्यांच्यासाठी ती पहिली पायरी असते.
Self-Reliant Women दुचाकी शिकणे म्हणजे स्वावलंबनच..!
Self-Reliant Women दुचाकी शिकणे म्हणजे स्वावलंबनच..!Dainik Gomantak
Published on
Updated on

Self-Reliant Women : वर्तमानातल्या या आधुनिक काळात स्त्रियांसाठी दुचाकी(Bike) शिकणे म्हणजे काय असते? नंदा जांबोटकर हिच्याकडे या प्रश्नाचे सुयोग्य उत्तर आहे. ती म्हणते, स्वावलंबनाकडे त्यांना घेऊन जाणारी, त्यांच्यासाठी ती पहिली पायरी असते. आज समाजात स्त्रिया वेगवेगळ्या क्षेत्रात ज्यातऱ्हेने भरारी घेत आहेत त्याकडे पाहिल्यास आज दुचाकी, ती देखील गिअरलेस, चालवण्याचे महत्त्व ते काय? पण तसा विचार केल्यास काही स्त्रियांचे परावलंबित्व आपल्याला अजूनही आकळले नसल्याचेच स्पष्ट होते.

Self-Reliant Women दुचाकी शिकणे म्हणजे स्वावलंबनच..!
Vastu Tips: घरातील भिंतींसाठी करावी योग्य रंगाची निवड,भासणार नाही पैशाची कमतरता

नंदा गेली पंधरा वर्षे फक्त स्त्रियांना दुचाकी शिकवते आहे आणि केवळ दुचाकी शिकल्याने काही स्त्रिया कशा स्वावलंबी बनल्या आहेत याची उदाहरणे तिच्याकडे आहेत. वरवर पाहिल्यास ही गोष्ट खूप सोपी-साधी वाटते पण आज जर एखाद्या स्त्रीला स्वतः वाहन चालवायला येत नसल्यास तिला पूर्णपणे नवऱ्यावर किंवा घरच्यांवर अवलंबून राहावे लागते अशी परिस्थिती आहे. नंदा म्हणते, असे काही नवरे आहेत जे तिच्याकडे आपल्या बायकोला घेऊन येतात आणि सांगतात, हिला तू छडी हातात घेऊन शिकवलेस तरी चालेल पण तिला वाहन चालवण्यास कसेतरी शिकवच. नवऱ्याला खरे तर म्हणायचे असते की आपल्या बायकोची वाहन चालवण्याबद्दलची भीती कशी तरी घालव किंवा दुसरे म्हणजे तिला स्वतःची कामे करण्याचे बळ येवो. जेव्हा एखादी सामान्य स्त्री दुचाकी चालवायला शिकते तेव्हा तिच्यात घडून आलेला बदल हा तिच्यासाठी आनंदाचा असतो. तिने स्वतःसाठी वेळ निर्माण केलेला असतो. तिने स्वतःसाठी एक छोटे स्वातंत्र्य मिळवले असते.

Self-Reliant Women दुचाकी शिकणे म्हणजे स्वावलंबनच..!
सम्राट क्लबच्या 'या' महान कार्यात विद्यार्थ्यांना मिळते स्फूर्ती

नंदाने आतापर्यंत सुमारे 500 स्त्रियांना दुचाकी शिकवलेली आहे. त्यातल्या काही स्त्रियांनी दुचाकी शिकल्यानंतर स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. काहींनी आपला व्यवसाय वाढवलेलाही आहे. स्वतः बाजार करणे, स्वतः कामावर जाणे या साऱ्या ‘स्वतः’च्या गोष्टीतला आनंद अनेक स्त्रियांना नंदाने मिळवून दिलेला आहे.

नंदा जरी खोर्लीला राहते व स्त्रियांना दुचाकी शिकवण्याचे काम तिथल्या भागातच करते तरी पार काणकोणपासून तिला या कामाबद्दल विचारणा येत असतात. दिवसाला ती सुमारे आठ स्त्रियांना दुचाकी शिकवते. प्रत्येक स्त्रीसाठी शिकवण्याचा कार्यकाल पंधरा दिवसांचा असतो. नंदाने 63 वर्षांच्या आजीलाही दुचाकी शिकवली आहे. नंदा सांगते, त्या आजीला दुचाकी शिकून फार मोठी सैर वगैरे करायची इच्छा नव्हती, पण आपल्या आयुष्यात आपण एखादे वाहन चालवायला शिकले याचाच आनंद तिला मिळवायचा होता.

नंदाच्या या कामाची सुरुवात अतिशय साध्या गोष्टीतून झाली. तिने आपल्या मैत्रिणीला दुचाकी चालवायला शिकवले. मैत्रिणीने ही गोष्ट आपल्या दुसऱ्या एका मैत्रिणीला सांगितली. तिचीही विचारणा नंदाकडे आली आणि दुचाकी शिकवण्याच्या प्रवासाला अशी सुरुवात झाली.

नंदा म्हणते, सरकारने दुचाकी शिकवण्याच्या व्यवसायालादेखील मान्यता द्यायला हवी. त्यामुळे अशा कामात रस असलेल्यांसाठी एक कायम रोजगार तयार होऊ शकेल. स्त्रियांनी जर हे काम व्यवसाय म्हणून स्वीकारले तर अनेक सामान्य स्त्रिया बिनदिक्कतपणे दुचाकी शिकायला पुढे सरसावतील. आपल्याला कल्पना नसली तरी ज्यांना एकही वाहन चालवता येत नाही अशा स्त्रियांची संख्या गोव्यातही खूप आहे आणि नंदा म्हणते त्याप्रमाणे जर स्वावलंबनाकडे वळायचे असेल तर आजच्या काळात निदान दुचाकी चालवता येणे आवश्यक आहेच.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com