Secondhand Car Buying Tips: तुम्हीही सेकंड हँड कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.सेकंड हँड कार खरेदी करतांना काही गोष्टींची काजी घेतल्यास तुम्ही कमी बजेटमध्ये खरेदी करू शकता. आजच्या फसवणुकीच्या काळात चांगली सेकंड हँड कार खरेदी करणे इतके सोपे नाही. पुढिल काही टिप्स वापरून तुम्ही सेंकड हँड कार खरेदी करू शकता.
स्वत:चे बजेट ठरवावे
सेकंड हँड कार खरेदी करण्यासाठी तुम्हाला सर्वात पहिले बजेट ठरवावे लागेल. जेणेकरून त्या बजेटनुसार तुम्हाला पर्याय शोधता येतील. या बजेटमध्ये केवळ कारच नाही तर कारमध्ये काही दुरुस्तीची आवश्यकता असल्यास विमा देखील समाविष्ट केला पाहिजे. बजेट ठरल्यानंतर तुम्ही सहज कार खरेदी करू शकता.
गुगलवर सर्च करावे
गुगलच्या मदतीने तुम्ही जे मॉडेल खरेदी करणार आहात त्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ शकता. या मॉडेलबाबत काही अडचण किंवा समस्या आहे का? त्या मॉडेलसाठी ग्राहकांचा रिव्ह्यू पाहावे आणि त्या कारसाठी कधीही काही रिकॉल जारी केले गेले आहेत का हे शोधण्याचा प्रयत्न करावा. याशिवाय, कारच्या मालकाला कारची सर्विस आणि मेंटेनेंस यासंबंधीची कागदपत्रे देखील मागावी. जेणेकरून कारची काळजी कशी घेतली गेली आहे हे तुम्हाला समजेल.
कार विकणाऱ्याबद्दल माहिती
जर तुम्ही प्राव्हेट सेलरकडून कार खरेदी करत असाल तर त्याबद्दल नीट माहिती जाणून घ्या. जेणेकरुन तुमची कोणत्याही प्रकारची फसवणूक होणार नाही
कार नीट चेक करावी
सेकंड हँड कार खरेदी करण्यापूर्वी त्याची नीट पाहणी करावी. यासाठी तुम्ही मेकॅनिकचीही मदत घेऊ शकता. जर कोणी विश्वासार्ह असेल तर तुम्ही स्वतः टेस्ट ड्राइव्ह देखील करू शकता.
मायलेज चेक करावा
सेकंड हँड कार खरेदी करण्यापूर्वी मायलेज चेक करून घ्यावा. जर त्या कारचे मायलेज खूप कमी असेल, तर कार योग्यरित्या चालविली गेली नाही आणि तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. अशा वेळी कार खरेदी करू नये.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.