या वर्षातील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण (Lunar Eclipse) 19 नोव्हेंबर रोजी होणार आहे. हे चंद्रग्रहण भारतात उपछाया ग्रहण महणून दिसेल. 19 नोव्हेंबर रोजी सकाळी 11:34 वाजता होईल आणि संध्याकाळी 05:33 वाजता संपेल. 2021 मधील शेवटचे चंद्रग्रहण युरोप, भारत, उत्तर-पश्चिम आफ्रिका, उत्तर आणि दक्षिण अमेरिका आणि आशियातील अनेक भागांमधून दिसेल. चंद्रग्रहणाला (Lunar Eclipse) धार्मिक महत्वाबरोबर वैज्ञानिक महत्व देखील आहे. ज्योतिषशास्त्रात चंद्रग्रहणाला अशुभ मानले जाते. या दरम्यान शुभ कार्य केले जात नाही. मंदिरात प्रवेशाला सुद्धा बंदी असते. शास्त्रज्ञांच्या मते, ही एक खगोलीय घटना आहे. जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्यामधे येते, तेव्हा चंद्रावर पडणारा प्रकाश अडतो, याला चंद्रग्रहण म्हणतात.
* या राशींवर पडेल प्रभाव
19 नोव्हेंबर ही कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाची पौर्णिमा तिथी आहे. या दिवशी वृषभ आणि कृतिका नक्षत्रामध्ये चंद्रग्रहण (Lunar Eclipse) असेल. ज्योतिषांच्या मते , या राशीमध्ये आणि या नक्षत्रात जन्माला आलेल्या लोकांनी सावधगिरी पाळावी. या राशीच्या लोकांनी या दिवशी वाद-विवादापासून दूर राहावे. तसेच प्रवासा दरम्यान किंवा वाहन चालवतांना काळजी घ्यावी.
ग्रहणानंतर काय करावे
* धार्मिक मान्यतेनुसार, चंद्रग्रहणानंतर (Lunar Eclipse) स्नान करावे. असे मानले जाते की स्नान केल्याने ग्रहणाचा प्रभाव कामो होतो. आंघोळीच्या पाण्यात गंगेचे पाणी घालून स्नान करावे.
* ग्रहण संपल्यानंतर आंघोळ करावी आणि नंतर स्वच्छ कपडे घालावे.
* ग्रहण संपल्यानंतर गंगेचे पाणी घरात शिंपडावे. तसेच घराच्या मंदिरातही गंगाजल शिपडावे.
* ग्रहण संपल्यानंतर मंदिरातील देवतांना गंगेच्या पाण्याने अभिषेक करावे.
* चंद्रग्रहण (Lunar Eclipse) संपल्ल्यानंतर गाईला रोटी खायला द्यावी, असे करणे शुभ मानले जाते. धार्मिक श्रद्धेनुसार गाईला खायला दिल्याने घरातील सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.