
बदलत्या जीवनशैली आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. सायटिका ही देखील या समस्यांपैकी एक आहे. सायटिकामध्ये पाठीच्या खालच्या भागापासून कंबरेपर्यंत आणि घोट्यांपर्यंत वेदना होतात. कधीकधी ही वेदना इतकी तीव्र असते की रुग्ण अंथरुणावरुन उठूही शकत नाही. चला तर मग सायटिका का होतो आणि त्याची सुरुवातीची लक्षणे कोणती आहेत? याबाबत वरिष्ठ ऑर्थोपेडिक सर्जनकडून जाणून घेऊया...
दरम्यान, आजकाल सायटिकाची समस्या कॉमन होत चालली आहे. ही समस्या बहुतेकदा लठ्ठपणाने ग्रस्त असलेल्या लोकांमध्ये दिसून येते. सायटिकामुळे तीव्र वेदना होतात, ज्यामुळे कधीकधी उभे राहणे देखील कठीण होते. इतकेच नाहीतर जेव्हा ही समस्या वाढते तेव्हा रुग्णाला इतर अनेक समस्यांना देखील तोंड द्यावे लागते. वरिष्ठ ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. अजय पनवार सांगतात, सायटिका ही प्रामुख्याने पाठीच्या कण्यातील डिस्कची समस्या आहे. हर्निएटेड डिस्क हे सायटिकाचे सर्वात सामान्य कारण आहे. याशिवाय, स्लिप डिस्क देखील त्याचे कारण आहे. जेव्हा स्पायनल डिस्क त्याच्या जागेवरुन घसरते तेव्हा ती सायटिक नर्व्हवर दबाव आणू शकते.
डॉ. पनवार स्पष्ट करतात, सायटिकाची समस्या बहुतेकदा लठ्ठपणा असलेल्या लोकांमध्ये होतो. जास्त वजन असल्याने पाठीच्या कण्यावर दबाव येतो, ज्यामुळे कधीकधी सायटिक नर्व्ह दाबली जाते. यामध्ये सुरुवातीला कंबरेच्या खाली सौम्य वेदना सुरु होतात. हलक्या वेदनांमुळे रुग्ण त्याकडे दुर्लक्ष करतात किंवा काही क्रीम इत्यादी लावतात. ज्यामुळे ही समस्या हळूहळू वाढू लागते आणि लक्षणे देखील तीव्र होतात. गंभीर लक्षणांमध्ये कंबरेच्या खालच्या भागातील वेदनाचा समावेश होतो, ज्या पुढे पायापर्यंत होऊ शकतात. मांडीच्या मागच्या बाजूला, खालच्या पायाच्या मागच्या भागात आणि पायाच्या तळव्यामध्ये तीव्र वेदना होतात. पायात मुंग्या येणे किंवा बधीरपणा जाणवणे ही देखील या आजाराची लक्षणे आहेत.
जर तुम्हाला सायटिकाची सुरुवातीची लक्षणे जाणवली तर ताबडतोब तपासणी करुन घ्या. यासोबतच, तुम्ही फिजिओथेरपिस्टचा सल्ला घेऊ शकता. जर तुम्हाला आराम मिळत नसेल तर तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधून उपचार सुरु करु शकता. सुरुवातीच्या टप्प्यात काही औषधे आणि थेरपी आराम देऊ शकतात. कधीकधी समस्या वाढल्यावर शस्त्रक्रिया देखील करावी लागते. जर तुम्हाला लघवी आणि मल नियंत्रित करण्यात अडचण येत असेल, तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधू शकता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.