Recipe: मुलं काहीतरी चविष्ट खाण्याचा हट्ट करतात, झटपट बनवा समोसा रोल

Samosa Roll Recipe: समोसा रोल हा एक उत्तम नाश्तासाठी पर्याय असू शकतो .
Samosa Roll
Samosa Roll Dainik Gomantak

समोसा हे स्ट्रीट फूड अनेकांचे आवडते आहे. त्यामुळे त्याला सर्वाधिक मागणी आहे. तुम्ही पारंपारिक समोसे खाण्याचा आस्वाद गेतला असेल पण तुम्ही कधी समोसा रोल ट्राय केला आहे का? जेव्हा तुम्हाला दिवसा भूक लागते तेव्हा समोसा रोल (Samosa Roll) हा एक उत्तम नाश्ता असू शकतो . समोशाचे नाव ऐकताच लहान मुलाच्या आणि मोठ्यांच्या तोंडाला पाणी येते. अनेकदा दिवसभरात मुल काहीतरी चवदार खाण्याची मागणी करत असतात. समोसा रोल बनवून तुम्ही त्यांना खायला देऊ शकता. चवदार आणि बनवायला सोपे आहे.

समोसा रोल बनवण्यासाठी लागणारे साहित्य

मैदा - 3 कप

उकडलेले बटाटे - 5-6

जिरे - 1/2 टीस्पून

ओवा - 1 टीस्पून

आमचूर पावडर - 1/2 टीस्पून

हिरवी मिरची चिरलेली - 2-3

गरम मसाला - 1 टीस्पून

कॉर्न फ्लोअर - 1 टीस्पून

कोथिंबिर चिरलेली - 2 चमचे

हिंग - 1 चिमूट

तेल- आवश्यकतेनुसार

मीठ - चवीनुसार

Samosa Roll
Medicines: औषधांसोबत 'या' गोष्टींचे सेवन केल्यास आरोग्यासाठी ठरू शकते घातक

* समोसा रोल बनवण्याची पद्धत

समोसा रोल बनवण्यासाठी प्रथम सर्व पीठ एका भांड्यात घ्या.त्यात ओवा, मीठ आणि 2-3 चमचे तेल घालून मिक्स करा. आता थोडे पाणी घालून मऊ पीठ मळून घ्या. यानंतर पीठ कापडाने झाकून तासभर बाजूला ठेवा. आता बटाटे कुकरमध्ये उकळा. यानंतर त्यांची साले काढून एका भांड्यात मॅश करा. आता कढईत तेल टाकून मध्यम आचेवर गरम करायला ठेवा.

तेल गरम झाल्यावर त्यात जिरे आणि चिमूटभर हिंग, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि बटाटे यांचे मिश्रण चांगले मिक्स करा. यानंतर गरम मसाला आणि कॉर्नफ्लोअर घालून मिक्स करा. यानंतर चवीनुसार मीठ घालून मिश्रण तळून घ्या. त्यात हिरवी कोथिंबीरही घाला. अशा प्रकारे समोसा रोलसाठी तुमचे स्टफिंग तयार आहे.

आता मळलेले पीठ घेऊन त्यावर थोडे तेल लावून परत एकदा मळून घ्या. आता त्याचे समान प्रमाणात गोळे बनवा. आता एक गोळा घ्या आणि त्याला दंडगोलाकार आकार द्या. यानंतर ते कापून एका भागात बटाटा मसाला ठेवून रोल करा. यानंतर शेवटच्या भागावर पाणी लावून रोल चिकटवा. त्याचप्रमाणे सर्व सारणातून रोल तयार करून एका मोठ्या थाळीत बाजूला ठेवा.

नंतर एका कढईत तेल टाकून मोठ्या आचेवर गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यात समोसे रोल टाकून तळून घ्या. या दरम्यान गॅसची आच मध्यम करावी. रोल्सचा रंग सोनेरी होऊन कुरकुरीत झाल्यावर प्लेटमध्ये टिश्यू पेपर ठेवून बाहेर काढा. त्याचप्रमाणे सर्व समोसे रोल तळून घ्या. स्नॅक्ससाठी तुमचे स्वादिष्ट समोसे रोल तयार आहेत. मुलांना टोमॅटो सॉस किंवा हिरव्या चटणीबरोबर सर्व्ह करा. त्याचाही आनंद घ्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com